शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात परवा भाजपाच्या खासदारांचे उपोषण, १८ रोजी कार्यकारिणी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 21:42 IST

गोव्यातही भाजपाचे खासदार श्रीपाद नाईक (केंद्रीय आयुषमंत्री) , नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर परवा म्हणजेच गुरुवारी (दि.१२) येथील आझाद मैदानावर सकाळी १0 ते सायंकाळी ५ उपोषण करणार आहेत.

पणजी : गोव्यातही भाजपाचे खासदार श्रीपाद नाईक (केंद्रीय आयुषमंत्री) , नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर परवा म्हणजेच गुरुवारी (दि.१२) येथील आझाद मैदानावर सकाळी १0 ते सायंकाळी ५ उपोषण करणार आहेत. संसदेत काँग्रेसने गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणल्याच्या निषेधार्थ हे उपोषण आहे.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या महिन्याच्या दुस-या आठवड्यात गोवा भेटीवर येणार आहेत. शहा यांची ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल. मेळावा घेऊन ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. येत्या १८ रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस बी. एल. संतोष, संघटन सचिव विजय पुराणिक, निरीक्षक अविनाश राय खन्ना हे या बैठकीला उपस्थित राहतील. आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त संघटना मजबूत करण्यासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम निश्चित करण्यासाठी तसेच शहा यांच्या भेटीचा कार्यक्रम आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन आहे. 

पीडीए आंदोलनाबाबत काँग्रेसवर आरोप पीडीएच्या प्रश्नावर काँग्रेसच आंदोलकांना भडकावित असल्याचा आरोप तानावडे यांनी केला. जाहीर सभा तसेच एकूणच आंदोलनात काँग्रेसचा हात आहे आणि काँग्रेसच आगित तेल ओतत असल्याचा आरोप त्यांनी केला. ताळगांव आधीही पीडीएचा भाग होता असे नमूद करुन भाजपाचे मंडल अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी जे काही विधान केले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचे नव्हे, असे तानावडे एका प्रश्नावर म्हणाले. दरम्यान, अमेरिकेत उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता पर्रीकर हे उपचारांना प्रतिसाद देत असून मेमध्ये गोव्यात परतण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा