शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेकबकडून हजारो कोटींचे खनिज निर्यात, एसअायटीकडून वागुस -पाळी खाणीचे सर्व्हेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:19 IST

फिलीप जेकबने हजारो कोटी रुपये किंमतीचा खनिज माल वागुस - पाळी येथील खाणींवरून उचलल्याचा विशेष तपास पथकाचा (एसअायटी) दावा असून सोमवारी एसआयटीने खाण अधिका-यांसह या खनिज डंपची पाहणी केली. 

पणजी: फिलीप जेकबने हजारो कोटी रुपये किंमतीचा खनिज माल वागुस - पाळी येथील खाणींवरून उचलल्याचा विशेष तपास पथकाचा (एसअायटी) दावा असून सोमवारी एसआयटीने खाण अधिका-यांसह या खनिज डंपची पाहणी केली. केरळ येथील फिलीप जेकब या खनिज ट्रेडरने कोट्यवधी रुपयांचा खनिज माल बेकायदेशीरपणे निर्यात केल्याचे आढळून आल्यामुळे त्याला केरळ येथे जाऊन एसआयटीने अटक केली होती. गोव्यातील खाण मालकांशी त्याचे आसलेले संबंध आणि त्यांच्याशी झालेले व्यवहारही उघडकीस आणले होते. त्याने वागुस पाळये येथील खाणीवरील खनीज डंप मोठ्या प्रमाणावर उचलून निर्यात केली होती. त्यामुळे खाण खात्यातील काही अधिका-यांना घेऊन एसआयटीने या खाणीचे सव्हेक्षण केले.  सुमारे ६० हजार मेट्रीक टन खनिज डंप तेथून उचलण्यात आल्याची माहिती एसआयटीचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. २००६ ते २०१२ या काळात हे बेकायदेशीर व्यवहार मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. फिलीप जेकबने गोव्यातील खाण मालकांशी ४०० कोटी रुपयांचे व्यवहार केले असल्याची बँक ट्रान्जेक्शन ही एसआयटीला मिळाली आहेत. आरटीजीएसद्वारे कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले होते असेही उघडकीस आले आहे. निरीक्षक दत्तगुरू सावंत, एसआयटीचे सदस्य नवीन पालयेकर, किरण परब, कल्पेश शिरोडकर, खाण खात्याचे सहाय्यक भूगर्भतज्ज्ञ सुधीर मांद्रेकर आणि वसंत कारेलियन हेही पथकासमवेत होते.

टॅग्स :goaगोवा