शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मगोपच्या विलीनीकरणाचा प्रश्नच नाही, मुख्यमंत्रिपदही यापूर्वी नाकारले : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 19:55 IST

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण यापूर्वी भाजपाने दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील नाकारून मगोपचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण यापूर्वी भाजपाने दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील नाकारून मगोपचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. यापुढेही कायम असेल, असे मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे सांगितले.मगोपची येत्या 17 रोजी आमसभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री ढवळीकर यांनी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार दीपक प्रभू पाऊसकर, माजी आमदार नरेश सावळ, कार्याध्यक्ष नारायण सावंत आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. मगोपचे विलीनीकरण होणार असल्याच्या अफवा परसविल्या जात आहेत. यापूर्वीच्या काळात भाजपने व काँग्रेसनेही दिलेली ऑफर आपण नाकारली आहे. मगोपमुळे आपली आमदार म्हणून कारकीर्द सुरू झाली. मगोप हा गोमंतकीयांच्या हृदयातील आणि या मातीतील पक्ष आहे. यापूर्वी युजी पक्ष होता. तो इतिहासजमा झाला. मगोप मात्र गेली पन्नास वर्षे गोव्याच्या विधानसभेत आहे. सध्या जे सरकार भाजपने घडवले आहे, ते केवळ मगोपमुळे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होत असतील तर आम्ही सरकारसोबत आहोत, असे सांगून आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केले, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. भाजपने सध्या आम्हाला कोणतीच अट घातलेली नाही. एकदाच भाजपच्या नेत्यांनी मगोपचे विलीनीकरण भाजपमध्ये केल्यास मुख्यमंत्रिपद देऊ, असे आपल्याला सांगितले होते. पण आपण नकार दिला. मगोप हा केंद्रातील एनडीएमध्ये सहभागी व्हावा असा ठराव पक्षाच्या केंद्रीय समितीने अजून घेतलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी काय भूमिका घ्यावी ते मगो पक्ष ठरवेल. येत्या 17 रोजी मगोपच्या आमसभेवेळी विद्यमान केंद्रीय समितीला मुदतवाढ द्यावी की काय तेही आमसभेतच ठरणार आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.काही पक्षांचे नेते मगोपला घाबरतात व त्यामुळे अफवा पसरविल्या जातात. काहीजण काँग्रेसधार्जिणे आहेत. त्यांना भाजपची साथ मगोपने सोडावी असे वाटते. आघाडी सरकार असते तेव्हा तडजोडीची भूमिका घ्यावी लागते, अन्यथा संसार दुभंगतो व घटस्फोट घ्यावा लागतो. तडजोडीची भूमिका घेऊन मगो पक्ष संसार चालवत आहे, असेही ढवळीकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. दरम्यान, पूर्ण मगो पक्ष संघटीत असून लोकही मगोसोबत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गोमंतकीयांनी 12 ते 13 टक्के मते मगोपला दिली आहेत, असे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले. माङया मतदारसंघातील व गोवाभरातील लोक मगोपवर खूश आहेत. मी कार्यकर्ता होतो, मला मगोपने आमदार केले, असे पाऊसकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा