शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण गोव्यात 24 तास अंखडीत वीजपुरवठा होईपर्यंत वीज दरवाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 21:38 IST

दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री क्राबाल हे उपस्थित होते . या कार्यक्रमांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

मडगाव : संपूर्ण गोव्यात चोवीस तास वीजपुरवठा होईपर्यंत वीजदरवाढ केली जाणार नाही. अशी ग्वाही गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी शनिवारी सायंकाळी दिली. दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री क्राबाल हे उपस्थित होते . या कार्यक्रमांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

वीज नियमन प्राधिकरणाने जरी वीजदरवाठ केली तरी ती सरकार लोकांवर लादणार नाही तर सरकार ती सोसेल त्यामुळे लोकांना या दरवाढीची झळ बसणार नाही. ते म्हणाले की आपण मंत्रीपद स्वीकारल्यास महिना होत आला आहे. त्यावेळी आपण पंचेचाळीस दिवसात एकंदर वीजस्थितीवर श्र्वेतपत्रिका जारी करू असे आश्र्वासन दिले होते. पण नंतर केलेल्या अभ्यासात खात्यात जागोजागी बजबजपुरी माजलेली आहे व ती गेल्या दहा वर्षापासूनची असल्याने ही श्र्वेतपत्रिका जारी करण्यास आणखी पंधरा दिवस लागतील.

मडगावांत 7 कोटी खर्चून घातलेली भूवीज केबल कार्यान्वितच झालेली नाही. ती कुठे घातली होती त्याचा देखील पत्ता नव्हता आताच कुठे तो लागलेला असून त्या पुढील पावले उचललेली आहेत. पर्वीत नव्या सचिवालयासाठी घातलेली अशीच भूवीज केबल कार्यान्वित न होता पडून होती व ती कार्यान्वीत करण्याचे काम सुरु केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

खात्यांत अधिक्षक अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. दोन सहाय्यक मुख्य अभियंत्यांची पदे अशीच रिक्त आहेत व त्यामागील कारण पात्र उमेदवार नाहीत ही आहेत. जे आहेत त्यांना तांत्रिक कारणास्तव पढती देता येत नाहीत. येत्या 31 ऑकेटोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यासाठीच्या नियमात बदल करून ती पदे भरली जातील, ते म्हणाले. गोव्यात वीज निर्मिती होत नाही व म्हणून सेंट्रल ग्रीडकडून ती घेण्यासाठी तसेच उच्च दाबाच्या वाहिन्या टाकण्यासाठी अधिक मनोरे उभारण्याची गरज आहे त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले व त्यासाठी जमीन संपादन केली जाणार नाही, तिची मालकी लोकांकडेच राहिल पण तिचा योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. वीजपुरवठय़ासंदर्भातील पायाभूत सुविधा पीपीपी तत्वावर उभारण्याचा संकेतही काब्राल यांनी दिला.

टॅग्स :goaगोवाelectricityवीज