शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अवकाळी पावसाचा फटका, ठिकठिकाणी वीज पडल्याने नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:43 IST

वीजेच्या गडगडाटासह जोराचा पाऊस

नारायण गावस, पणजी (गोवा): आज पहाट विजेच्या गडगडाटासह सुरू झालेला अवकाळी पावसाने राज्यभर हाहाकार घातला. बहुतांश ग्रामीण भागांपासुन शहरी भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. यामुळे आज सकाळपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. सत्तरी, डिचाेली तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला. तसेच शहरी भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक भागांमध्ये पडझडीच्या घटनाही समाेर आल्या आहेत.

वीजेच्या गडगडाटासह जोराचा पाऊस

गोवा हवामान खात्याने दाेन दिवस येलो अलर्ट दिला होता. पण सोमवार व मंगळवार दोन दिवसांपासून गोव्यातील उष्णतेचा पारा चांगलाच चढला होता. मंगळवारी मध्यरात्री अचानक सर्वत्र गडगडाटासह पाऊस सुरु  झाल्याने सर्वांना फटका बसला आहे. वीज पडल्याने अनेक ठिकाणी वीज गुल झाली  होती.  यामुळे अनेकांच्या साहित्याचेही नुकसान झाले.

नरकासूर प्रतिमांवर पावसाचा फटका

दिवाळीला मोजकेच दाेन दिवस शिल्लक असल्याने राज्यात माेठमाेठे नरकासुर करायला सुरु झाले आहेत. अनेक युवा संघांनी माेठमाेठे नरकासुर तयार  केले होते.  पण मध्यरात्री अचानक पाऊस झाल्याने अनेक नरकासूरांच्या प्रतिमा भिजल्या आहेत. काही जणांना रात्री उशीरा त्यांच्यावर प्लास्टीकचे कवर घातले. तसेच पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने  दिवाळीवर याचा परिणाम जाणवू शकतो.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर परिणाम

राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. पण अचानक पाऊस सुरु झाल्याने याचा फटका या स्पर्धावर जाणवला मुसळधार पाऊस झाल्याने पणजील प्रमुख कांपाल मैदानावर पाणी साचले होते. यामुळे या ठिकाणी काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या. तसेच इतर अनेक ठिकाणी पावसाचा क्रीडा स्पर्धावर परिणाम दिसून आला.

इफ्फीच्या तयारीवर परिणाम

इफ्फीला फक्त १२ दिवस शिल्लक असल्याने इप्फीची तयारीही जोरात सुरु आहे. इफ्फीचे प्रमुख ठिकाण असलेल्या. गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात दिखाव्याचे काम सुरु होते. पण पावसामुळे या कामावर याचा परिणाम झाला आहे. सजावटी काम नुकतेच हाती घेतले होते. पण अचानक पडलेल्या पावसामुळे  जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा पणजीत स्मार्ट सिटीच्या खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने  चिखल झाला होता. त्यामुळे  अनेक वाहन चालकांनाही याचा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसgoaगोवा