शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल

By किशोर कुबल | Updated: March 21, 2024 16:19 IST

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही.

पणजी : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना गोव्यात म्हादईचा विषय विरोधकांनी तापवला आहे. म्हादईबाबत ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही?, असा सवाल आरजीने केला आहे. गोवा फॉरवर्डनेही या प्रश्नावर सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी नव्याने काम सुरु केले आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा विषय गाजत आहे.

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हादईचे रक्षण करण्यासाठी भाजपने ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? असा प्रश्न करुन ‘सेव्ह म्हादई’ कुठे आहे? या चळवळीचे नेतृत्त्व करणारे कॉंग्रेसी नेते कुठे आहेत? असा प्रश्न केला असून कणकुंबी येथून जर मोर्चा काढला तर कॉंग्रेससोबत सहभागी होण्याची आमची तयारी आहे?, असे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान,  कर्नाटकने मलप्रभा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी नाल्यावर बांधकाम सुरू केले आहे, अशी माहिती देताना सरदेसाई यांनी तेथे  सुरू असलेल्या कामांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. सभागृह समितीची बैठक बोलावण्याची वारंवार विनंती करूनही सरकारने तसे करण्याची तसदी घेतली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

हा निवडणूक स्टंट -दरम्यान, विरोधक उपस्थित करीत असलेला म्हादईचा विषय हा निवडणूक स्टंट असल्याचा दावा करीत दरवेळी निवडणुकीआधी विरोधी पक्ष हा विषय उकरुन काढतात, अशी टीक भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे.

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही. 

टॅग्स :goaगोवाriverनदी