शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ दूधसागर नदीची पातळी कमी, बंद खाणीचे पाणी नदीत सोडण्यास सुरुवात 

By आप्पा बुवा | Updated: May 3, 2023 20:02 IST

परिसरात बसवलेल्या सदर ४ पंपांमधून प्रतिदिन २० एमएलडी पाणी दूधसागर नदीत सोडण्यात येणार आहे.

ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ दूधसागर नदीची पातळी कमी झाल्याचे लक्षात येताच पाणी पुरवठा सुरळीत व्हावा व लोकांची गैरसोय होऊ नाही म्हणून, जलस्रोत खात्यातर्फे बंद खाणीचे पाणी बुधवारी पासून नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे. सातोण - दाबाळ येथे एक पंप तर कोडली खाणीवर तीन पंप बसविण्यात आले आहेत. परिसरात बसवलेल्या सदर ४ पंपांमधून प्रतिदिन २० एमएलडी पाणी दूधसागर नदीत सोडण्यात येणार आहे.

  ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प हा फोंडा व तिसवाडी साठी वरदान ठरत आहे. दोन्ही तालुक्याना पाणी पुरवठा हा ओपा प्रकल्पातून केला जातो. गेल्या काही दिवसापासून दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर होती. जलस्रोत खात्यातर्फे बंद खाणीमधून पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्या २-३ दिवसापासून पंप बसविण्याची काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते. सातोण - दाबाळ येथील झारापकर आणि पारकर खाण कंपनीच्या बंद खाणीचे पाणी पंप बसवून नदीत सोडण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली. यावेळी धारबांदोडा तालुक्यातील जलस्रोत खात्याचे सहायक अभियंता सदानंद नाईक, कनिष्ठ अभियंता सागर नाईक, स्थानिक पंच भोला गावकर व रमाकांत गावकर यावेळी उपस्थित होते. सातोण येथील बंद खाणींचे पाणी नदीत सोडण्यास पंच सदस्य रमाकांत गावकर व भोला गावकर यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.  ओपा प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वर्षापासून गांजे - उसगाव येथील म्हादई नदीचे पाणी  पुरवले  जात होते. परंतु यंदा कमी पाऊस पडल्यामुळे दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे जलस्रोत खात्याकडे  बंद खाणीतील पाणी हा पर्याय होता. खाणीतून पामी सोडल्यामुळे ओपा प्रकल्पाची पातळी नियंत्रणात येईल. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी