शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सूचना सेठच्या पतीची चौकशी सुरु

By काशिराम म्हांबरे | Updated: January 13, 2024 16:38 IST

सूचनाला आपण मुलाला भेटणे पसंद नव्हते. त्यामुळे ती आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती अशी माहिती व्यंकटरमण यांनी पोलिसांना दिली आहे.

म्हापसा: सिकेरी येथे आपल्या कोवळ्या ४ वर्षीय मुलाची हत्या केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सूचना सेठ हिचा पती व्यंकटरमण यांनी त्याचे पत्नी सूचना सोबत लग्नानंतरच्या संबंधाची माहिती कळंगुट पोलिसांना दिली. सूचनाला आपण मुलाला भेटणे पसंद नव्हते. त्यामुळे ती आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती अशी माहिती व्यंकटरमण यांनी पोलिसांना दिली आहे.

सूचनाचा पती व्यंकटरमण आज (शनिवारी) सकाळी आपल्या वकिलासोबत चौकशीसाठी कळंगुट पोलीस स्थानकावर दाखल झाला. त्याला या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी पाचारण केले होते. त्यानुसार तो आलेला. त्याच्या चौकशी अंती या प्रकरणातील तपासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या बºयाच गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.  

पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी त्याची चौकशी करण्यास आरंभ केला. दोघांतील संबंधावर अनेक प्रश्न चौकशी दरम्यान त्याला विचारण्यात आले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सूचना आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती. न्यायालयाने व्यंकटरमणला दर रविवारी त्याच्या बाळाला भेटण्याची परवानगी दिलेली. मात्र सूचनामुळे आपण मागील ५ रविवार बाळाला भेटलो नाही असे त्यांनी चौकशी दरम्यान  पोलिसांना सांगितले.

१८ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांचा विवाह झालेला.  १४ आॅगस्ट २०१९ रोजी त्या मुलाचा जन्म झालेला. त्यानंतर २०२१ पासून सूचनाने पतीसोबत राहणे सोडून दिले होते. त्यानंतर घटस्पोटाची प्रक्रिया सुरु असताना बाळाचा ताबा कोणाकडे असावा असा प्रश्न निर्माण झालेला. मुलाच्या ताब्यावरून सुरु असलेल्या न्यायालयीन लढतीत यावर तोडगा म्हणून न्यायालयाने दर रविवारी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचेआदेश दिलेले.

पतीने आपला मानसीक तसेच शारीरिक छळ केल्याचा आरोपही सूचनाने व्यंकटरमण वर केला होता. ज्या दिवशी ही घटना घडलेली त्या दिवशी व्यंकटरमण इंडोनेशीयात होता. मुलाच्या हत्येनंतर त्याला भारतात बोलवून घेण्यात आले होते.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी