शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने भाऊंच्या समाधीलाही लावला चुना; आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 18:10 IST

साेमवारी आपचे नेते ॲड. अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, ॲड. सुरेल तिळवे यांनी भाऊंना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली.

पणजी: भाजप सरकार हे चुना लावण्यात हुशार आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला तो चुना लावून लपविण्यात आला. स्मार्ट सिटीसाठी हजारो कोटी खर्च करुनही सरकारला ही समाधी दुरुस्त करता आली नाही, असा आराेप आपचे गाेवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केला. साेमवारी आपचे नेते ॲड. अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, ॲड. सुरेल तिळवे यांनी भाऊंना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिली.

ॲड. अमित पालेकर म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर यांनी गाेव्याच्या विकासाचा पाया रचला राज्यभर शाळा बांधल्या आज त्यांची समाधी माेडकळीस आली आहे. पणजी राजधानीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले पण सरकारला यातील फक्त ५० लाख रुपये खर्च करुनही ही समाधी स्थळ दुरुस्त करता आली नाही. मुख्यमंत्री फक़्त जयंती आणि पुण्यतिथीला येथे येऊन श्रद्धांजली वाहतात. पण त्यांना ऐरव्ही येथे लक्ष द्यायला वेळ नाही. आजही मुख्यमंत्री फक़्त काही  मिनिटांसाठी आले व श्रद्धांजली वाहिली. सरकारने येत्या १२ मार्च भाऊसाहेबांच्या जयंतीपूर्वी हे समाधी स्थळ दुरुस्त केले नाही तर पुढच्या वेळी मुख्यमंत्र्यांना येथे श्रद्धांजली वाहायला दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

ॲड. सुरेल तिळवे म्हणाले, भाऊसाहेबांनी मगाे पक्षातर्फे अनेक विकास कामे केली होती. आता मगाेचे अध्यक्ष व सर्वेसर्वा हे सुदिन ढवळीकर आहेत. ते या पक्षाच्या नावाने राजकारण करत आहेत आणि स्वताचा विकास करत आहेत. ढवळीकरांना मगोचे तसेच भाऊसाहेबांचे काहीच पडलेली नही. त्यांनी फक्त या पक्षाच्या नावाने मंत्री पदाचा आस्वाद घेतला. एवढी वर्षे मंत्र राहूनही त्यांनी भाऊंसाठी काहीच केले नाही.