शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून ती विधानसभा निवडणूक मी हरलो: दामू नाईक; फातोर्डाच्या विकासाविषयी चर्चेस तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:40 IST

येथील रवींद्र भवनात एका कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाईक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : 'वेळ्ळी, नावेली, मडगाव आणि फातोर्डा या मतदारसंघांची २०१२ साली फेररचना झाली. पूर्वीच्या फातोर्डा मतदारसंघात कोंब व हाउसिंग बोर्ड या दोन ठिकाणी जास्त हिंदू मतदारांचा समावेश होता. ते दोन्ही भाग फातोर्डामधून वगळून एक कुडतरी मतदारसंघात, तर दुसरा मडगाव मतदारसंघात घालण्यात आला. त्यामुळे माझा पराभव झाला,' असा दावा फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केला. फातोर्डा मतदारसंघातील गेल्या १३ वर्षातील प्रकल्पांविषयी चर्चेस ठाम आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

रविवारी येथील रवींद्र भवनात एका कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाईक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, 'फातोर्डा मतदारसंघात माझ्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आले. त्यानंतर एकतरी आदर्श प्रकल्प फातोर्डा मतदारसंघात आला नाही. मी आव्हानावर आजही ठाम  आहे. फातोर्डा मतदारसंघातील आदर्श प्रकल्प दाखवा. मी कधीही चर्चेला तयार आहे. नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी फातोर्डा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात फातोर्डा मतदारसंघातील जिल्हाधिकारी कार्यालय, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ यांसारखे मोठे प्रकल्प आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत झाले. 

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचा नामोल्लेख न करता 'कोणी फुकटचे श्रेय घेऊ नये. जर कुणी प्रकल्प आणला असेल तर आपण आव्हान देत आहोत' असे म्हटले होते. नाईक यांनी आव्हानावर आजही ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आज जो फातोर्डा मतदारसंघ आहे तो माझ्या कारकिर्दीतील विकासकामांवर उभा आहे.

ते ओपन सिक्रेट...

दामू नाईक म्हणाले की, फातोर्डा मतदारसंघाचा जो विकास झाला, तो पंतप्रधान मोदींमुळे. विरोधकांनी इतिहास व वास्तव समजून घेऊन आपल्या ज्ञानात भर घालावी. माझा पराभव करण्यासाठी विरोधी आमदारांना कोणी पाठिंबा दिला, हे ओपन सिक्रेट आहे.

त्यांनी मंत्रिपद भोगले, पण...

माझा विषय केवळ फातोर्डा मतदारसंघापुरता मर्यादित नाही. गोवाभाजपामय करणे हा प्रयत्न आहे. त्यात फातोर्डा मतदारसंघही येतो. विरोधक माझ्यावर रवींद्र भवन, जिल्हा इस्पितळ या प्रकल्पांसंबधी बोट दाखवतात त्यांना मी सांगू इच्छितो की, मी केवळ प्रकल्पांचे स्वागत केले. त्या प्रकल्पांचे बांधकाम मी केलेले नाही, हे त्यांनी ध्यानी घ्यावे. मी कधी मंत्री, उपमुख्यमंत्री झालो नाही. सहयोगींनी मंत्रीपद भोगले, परंतु फातोर्डा मतदारसंघाचा बेरोजगारीचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. तो आजही तसाच आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा