शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तळेखोल येथील खडी वाहतुकीला तात्पुरती स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:48 IST

मात्र ग्रामस्थ आंदोलनावर ठाम

दोडामार्ग  : अंधाधुंद खडी उत्खलनामुळे हैराण तळेखोल येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषण आरंभल्यानंतर तहसीलदार कार्यालयाने येथील खडी वाहतुकीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र पंचायत क्षेत्रातील खडी उत्खलन पूर्णपणे बंद होत नाही, तोवर उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रम पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, खाण विभागाचे अधिकारी शनिवारी  तळेखोल गावाला भेट देणार असून यावेळी गावात तीव्र निदर्शने होण्याची शक्यता आहे.गोव्याच्या सीमेलगत असलेल्या तळेखोल गावात सद्या पाच खडी क्रशर सुरु असून या क्रशरसाठी येथील जंगल परिसरात अंधाधुंद उत्खलन केले जात आहे. याचे गंभीर परिणाम सदया या गावात दिसून येत असून त्यामुळे गाव आक्रमक झाला आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या दुस-या दिवशी तळेखोल गावातील महिला मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी शिवसेनाच्या स्थानिक पुढाºयांसमवेत तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी तळेखोल येथील खडी वाहतूक तातडीने बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. परंतु यावेळी तहसीलदारांनी आडेवेढे घतल्याने ग्रामस्थ यावेळी आक्रम झाले. कारवाई न झाल्यास आंदोलनकारी तहसीलदार कार्यालयात येउन ठाण मांडतील असा इशारा यावेळी देण्यात आल्यानंतर वाहतूक बंद करण्यासंदर्भातील नोटीस आपण बजावतो असे सांगितले.  अधिकारी आज पाहणी करणारसिधुदुर्ग व कोल्हापूर खाण विभागाचे अधिकारी आज शनिवारी तळेखाल गावाला भेट देणार असून येथील स्थितीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :agitationआंदोलनgoaगोवा