शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या ठाम भूमिकेनंतर गोव्यातील टॅक्सीवाल्यांची नरमाईची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:41 IST

संघटनेच्या निर्णयावरच सर्व काही अवलंबून

मडगाव: गोवा माइल्स अ‍ॅपबाबत सरकारने ठाम भूमिका घेतल्याने आतार्पयत या अ‍ॅपला विरोध करणारे व गोवा माइल्सला वेठीस धरणाऱ्या टॅक्सीवाल्याने नरमाईची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र टॅक्सी संघटना काय निर्णय घेते त्यावर सर्व काही अवंलबून आहे. अ‍ॅपला विरोध करीत पूर्वीच्याच पद्धतीने वाहतूक सेवा सुरु केली, तर त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होणार हे निश्चित आहे. टॅक्सीवाल्यांनाही आता त्याची जाणीव होऊ लागली आहे. मात्र संघटनेशी बांधील असल्याने एकतर्फी निर्णय घेता येत नाही अशी त्यांची स्थिती आहे. काहीजण खाजगीत तसे बोलूनही दाखवू लागले आहेत.

गोवा माइल्स टॅक्सीवाल्यांना वेठीस धरण्याचे प्रकार राज्यातील दक्षिण गोव्यातील सासष्टीतील किनारपट्टीभागातील कोलवा, वार्का तसेच मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरही घडलेले आहेत. या भागातील राजकारण्यांचा या टॅक्सीवाल्यांना पाठिंबा असल्याने गोवा माइल्स अ‍ॅपला माघार घ्यावी लागेल अशी खात्री या टॅक्सीवाल्यांना होती. मात्र परवा विधानसभेत अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी ठाम भूमिका घेताना अ‍ॅप आधारीत टॅक्सीच राज्यात धावेल असे ठासून सांगितले. टॅक्सीवाल्यांनी तीन महिने अनुभव घ्यावा. जर समाधान झाले नसेल तर स्वतंत्रपणो अ‍ॅप तयार करावे असेही सूचविले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतल्याने तसेच लोकांचीही टॅक्सीवाल्यांना सहानभुती नसल्याने आता या टॅक्सीवाल्यांची पायाखालील वाळू सरकू लागली आहे. लवकरच काहीतरी स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक आहे या मतापर्यंत हे टॅक्सीवाले येऊन पोहोचले आहेत. 

दक्षिणेत विशेषत: किनारपटटी भागात टॅक्सीवाल्यांची मुजोरी वाढली होती. उत्तर गोव्यातील टॅक्सीवाल्यांनाही येथील टॅक्सीवाले आपल्या भागात येण्यास मज्जाव करत होते. अनेकदा ते हातघाईवर आल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अशा प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. सरकार आता अ‍ॅपसंबंधी ठाम असल्याने यापुढे आपली डाळ शिजणे कठीण आहे हे एव्हाना या टॅक्सीवाल्यांनाही कळून चुकले आहे.

अजूनही आम्ही कुठल्याही निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलो नाही. लवकरच संघटनेची बैठक होईल, त्यात निर्णय होईल अशी माहिती टुरिस्ट टॅक्सी असोसिएशन गोवाचे उपसरचिटणीस फुर्कन शहा यांनी दिली. काही टॅक्सीवाल्यांशी चर्चा केली असता, आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर बोलताना आता सरकारने कडक भूमिका घेतल्याने काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय तरणोपाय नसल्याचे सांगण्यात आले. एकतर गोवा माइल्स सेवेकडे वळावे वा स्वत: अ‍ॅप सेवा सुरु करावी. यातील दुसरा पर्याय चांगला आहे असेही अनेकांनी बोलून दाखवले.

टॅग्स :Taxiटॅक्सी