शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर देशातील सर्वात प्रदूषित औद्योगिक वसाहत; औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिकलाही पर्यावरणाचे उपाय योजण्यास अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:03 IST

औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिकलाही पर्यावरणाचे उपाय योजण्यास अपयश

राजू नायकपणजी : देशातील निकृष्ट दर्जाच्या औद्योगिक वसाहतींमध्ये महाराष्ट्राच्या तारापूर वसाहतीचा क्रमांक खूपच वरच्या क्रमाने लागत असून औरंगाबाद आणि नाशिक औद्योगिक वसाहतींनाही आपले औद्योगिक प्रदूषण थांबवता आलेले नाही. उलट त्यांचा दर्जाही खालावत आहे.केंद्रीय विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्या ‘डाऊन टू अर्थ’ या पर्यावरणविषयक संशोधन पत्रिकेने आपला वार्षिक पर्यावरणविषयक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात औद्योगिक विश्वाचा कठोर आढावा घेतला आहे. 

जल प्रदूषणामध्ये देशातील ८८ प्रदूषित औद्योगिक वसाहतींमध्ये ज्यांची कामगिरी आणखी खालावली त्यामध्ये औरंगाबाद, नाशिक आणि तारापूर या औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. तारापूरने तर २००९ च्या तुलनेने खूपच वाईट कामगिरी केली आहे. ही निकृष्ट कामगिरी देशात सर्वाधिक आहे. औरंगाबादने २००९ च्या तुलनेने पाण्याचे प्रदूषण वाईट टप्प्यावर नेले आणि नाशिकची परिस्थिती अनेक दृष्टीने योग्य म्हणता येणार नाही.

सर्वांत प्रदूषित परिसर म्हणून जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील तारापूर, चंद्रपूर आदींचा समावेश आहे. सेपीने ६० ते ७० या क्रमवारीमध्ये ज्या औद्योगिक वसाहतींना क्रमवारी दिली आहे, त्यामध्ये नाशिकचाही समावेश होतो. या १२ नव्या औद्योगिक वसाहतींमध्ये महाराष्ट्रातील महाड औद्योगिक वसाहतीचाही समावेश होतो.  २००९ ते २०१८ पर्यंत वायू प्रदूषण वाढलेल्या सेपी निर्देशांकामध्ये चंद्रपूर, तारापूर व नाशिकचा समावेश होतो. त्यांच्यामध्ये चंद्रपूर आणि तारापूरने ७० चा निर्देशांक गाठला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी सेपीचा जो निर्देशांक निश्चित केला, त्याला कोणत्याही प्रकारे भीक न घालण्याचेच राज्यांचे धोरण आहे. २००९ पासून ते २०१८ पर्यंत औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण वाढले आणि अजूनही त्यामध्ये फरक दिसत नाही. ज्या औद्योगिक वसाहती निकृष्ट दर्जाच्या मानल्या गेल्या होत्या, त्या अजूनही भीषण अवस्थेत आहेत आणि त्यावर उपाय योजण्याचे सोडून केंद्र सरकार आणि राज्ये कायदे सौम्य करण्याच्याच हालचाली करू लागले आहेत. ही जर मानसिकता असेल तर कायदे आणि यंत्रणा निर्माण करण्यासाठी खर्च तरी का करावा? - निवित कुमार यादव,  शास्त्रज्ञ, डाऊन टू अर्थ

टॅग्स :environmentपर्यावरणMIDCएमआयडीसी