शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोलवा बीचवर रंगणार स्विमथॉनचा थरार, देशभरातील ७०० जलतरणपटूंचा होणार सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 20:06 IST

अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणारी स्विमथॉन २०१७ ही स्पर्धा रविवारी (दि. ३) कोलवा-मडगाव समुद्रकिनारी रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे आणि गोव्याची स्टार जलतरणपटू तलाशा प्रभू यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

पणजी : अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणारी स्विमथॉन २०१७ ही स्पर्धा रविवारी (दि. ३) कोलवा-मडगाव समुद्रकिनारी रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे आणि गोव्याची स्टार जलतरणपटू तलाशा प्रभू यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील ७०० खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक आशीष अग्रवाल यांनी दिली. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष असून या वर्षी खुल्या समुद्रामध्ये या आव्हानात्मक स्पर्धेसाठी विशेष त्रिकोणीय मार्गिका तयार करण्यात आली आहे. हा प्रयोग पहिल्यांदाच देशात होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेकडे राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा म्हणूनही पाहिले जाणार आहे. या स्पर्धेतील १० किमी आणि ५ किमी गटातील विजेत्या पुरुष व महिला खेळाडूस फिना वर्ल्ड चॅम्पियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकूल क्रीडा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.या वेळी गोवा पर्यटन विभागाचे राजेश काळे, साहाय्यक संचालक गणेश आर. तेली, गोवा जलतरण संघटनेचे सचिव सईद अब्दुल माजिद, बरुन कुमार खान, गिरीश बाबू आदी उपस्थित होते. अग्रवाल पुढे म्हणाले, की गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे ६०० जलतरणपटूंचा सहभाग लाभला होता, तर यंदा हीच संख्या हजारच्यापुढे जाईल. १० किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्या पुरुष - महिला जलतरणपटूंना प्रत्येकी ५० हजार, तर ५ किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जिंकण्याची संधी असेल. एकूण ४० लाख रुपयांची ही बक्षिसे आहेत. तसेच, खुल्या जलतरण क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी आणि नवोदितांना अधिक आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेत एक किमी आणि २.५ किमी अंतराची विशेष शर्यतही आयोजित करण्यात आली आहे.  स्पर्धेतील स्टार स्वीमर्स..गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत देशातील स्टार स्वीमर्स सहभागी होत आहेत. त्यात वीरधवल खाडे, तलाशा प्रभू, साजन प्रकाश, संदीप सेजवाल, मंदार दिवसे आणि रुचा यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी ही स्पर्धा अविस्मरणीय ठरणार आहे. ओपन वॉटर स्वीमिंग स्पर्धेसाठी गोव्याला कायमचे ठिकाण म्हणून संधी मिळाली, ही बाब अभिमानास्पद आहे. या उपक्रमाने भारतातील अनेक जलतरणपटू गोव्याच्या समुद्रकिनारी आपल्या कौशल्याची चाचणी घेतील. - सईद अब्दुल माजिददरवर्षी मी या स्पर्धेची वाट पाहत असते. या स्पर्धेच्या निमित्ताने मला माझ्या मित्रांना भेटण्याची संधी मिळते. वीरधवल, मंदार, रुचा हे देशाचे आघाडीचे जलतरणपटू असून त्यांना भेटल्यानंतर स्फूर्ती मिळते. नवोदितांसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहे. - तलाशा प्रभू (जलतरणपटू) स्पर्धेतील गट१० किमी- १४ वर्षांवरील पुरुष व महिला५ किमी-१४ वर्षांवरील पुरुष व महिला२.५ किमी१) १४ वर्षांखालील मुले-मुली२) १४ वर्षांवरील पुरुष व महिला३) ३५ वर्षांवरील पुरुष व महिला१ किमी स्वीमथॉन१) १४ वर्षांखालील मुले -मुली२) १४ वर्षांवरील पुरुष व महिला३) ३५ वर्षांवरील पुरुष व महिला

टॅग्स :goaगोवा