शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

'गोव्यात गोमांसबंदी करा, पर्रीकरांची प्रकृती सुधारेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:29 IST

मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारण्यासाठी 'या' व्यक्तीचा अजब सल्ला

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पर्रीकर काही दिवसांपूर्वी उपचारासाठी अमेरिकेलादेखील गेले होते. त्यानंतर एम्स रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर आता पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी अजब सल्ला दिला आहे. गोव्यात तातडीनं गोमांसबंदी केल्यास पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा अजब दावा चक्रपाणी यांनी केला आहे. मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं गोव्यात नेतृत्त्व बदल गरजेचा असल्याचं मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल व्यक्त केलं होतं. यानंतर चक्रपाणी यांनी राज्यात गोमांसबंदी करण्याची मागणी केली. गोमांसबंदी लागू झाल्यास मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे चक्रपाणी यांची ही अजब मागणी पर्रीकरांच्या विचारसरणीशी सुसंगत नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच पर्रीकर यांनी गोमांस व्यापाराचं समर्थन केलं होतं. देशातील अनेक राज्यांमध्ये गायींची, गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर हल्ले होत असताना पर्रीकर ठामपणे गोमांस व्यापाऱ्यांच्या बाजूनं उभे राहिले होते. मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठिक नसल्यानं त्याचा परिणाम राज्य कारभारावर होत असल्याची टीका विरोधकांनी वारंवार केली आहे. काँग्रेसच्या या टीकेनंतर पर्रीकर यांनी त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेट बैठक घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून पर्रीकर यांना 14 ऑक्टोबरला डिस्चार्ज मिळाला. यानंतर त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाChief Ministerमुख्यमंत्री