तिसवाडी : रायबंदर येथील ३५ वर्षीय अविवाहित युवकाचा मृतदेह रायबंदर येथील मिलरॉक पाण्याच्या टाकीजवळील झाडाला दोरखंडाने लटकताना बुधवारी आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती जुने-गोवे पोलिसांनी दिली. मात्र, मृताचे हात व पाय दोरखंडाने बांधले असल्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय आहे.पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभुवन-रायबंदर येथील परेश विनायक चोडणकर याने रायबंदर डोंगरावर गळफास घेल्याची खबर बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना दूरध्वनीद्वारे मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले असता, मृतदेह झाडाला लोंबकळत होता. मृतदेहाचे दोन्ही पाय व हात दोरखंडाने बांधले होते. (पान २ वर)
रायबंदर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: June 18, 2015 02:00 IST