शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात दहा पर्यटकांना बुडताना जीवरक्षकांनी वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:32 IST

गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू असून लाखो पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. नाताळ सण आणि नववर्ष साजरे करणं अशा दोन्ही हेतूंनी गोव्याकडे पर्यटकांचे पाय वळले आहेत. मात्र सागरकिना-यांवर उसळलेल्या गर्दीमध्ये काही दुर्घटनाही घडत आहेत.

पणजी : गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू असून लाखो पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. नाताळ सण आणि नववर्ष साजरे करणं अशा दोन्ही हेतूंनी गोव्याकडे पर्यटकांचे पाय वळले आहेत. मात्र सागरकिना-यांवर उसळलेल्या गर्दीमध्ये काही दुर्घटनाही घडत आहेत. उत्तर गोव्यातील हरमळमधील समुद्रात दहा पर्यटक बुडत असताना शुक्रवारी (22 डिसेंबर) सायंकाळी उशीरा जीवरक्षकांनी या सर्व दहा पर्यटकांना वाचविण्याची घटना घडली. शनिवारी जीवरक्षक संस्थेने सगळी माहिती जाहीर केली आहे.

हरमळ किना-यावर 60 पर्यटकांचा एक गट होता. त्यापैकी एक दहा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबीयांसोबत हरमळ समुद्रात उतरला. थोड्या  वेळाने हा मुलगा गटांगळ्या खात असल्याचे पर्यटकांनी पाहिले. बाजूलाच पाच पुरुष पर्यटक पोहत होते. हा मुलगा बुडत असल्याचे त्यांनी पाहिले व ते मुलाला वाचविण्यासाठी खोल समुद्रात गेले. याचवेळी या मुलाच्या कुटुंबीयांनीदेखील ही स्थिती पाहिली. कुटुंबामधील एक पुरुष व तीन महिलांनी तिथे धाव घेतली व मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दहा वर्षीय मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे सर्व नऊ पर्यटक त्या मुलासह एका लाटेच्या तडाख्यात सापडले.

यावेळी जीवरक्षक रामकृष्ण शक्शेली याने ही स्थिती पाहिली व त्याने किना-यावरील टॉवरला संदेश दिला व जेटस्कीला बोलावले. समुद्रात 50 मीटर पोहत जाऊन जीवरक्षकाने सर्व दहा पर्यटकांना गाठले. यावेळी जीवरक्षक मनोज परब व दत्तराज कोरगावकर यांनीही तिथे धाव घेतली. या तिन्ही जीवरक्षकांनी सर्व दहा पर्यटकांना बुडताना वाचवले व किना-यावर आणले. या दहापैकी आठजणांना श्वासोश्वास करताना त्रस होत होता. इतरांची स्थिती ठिक होती. त्यामुळे 108 रुग्णवाहिका बोलविण्यात आली. रुग्णवाहिकेमधून दोघांना तुयें येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. दोघांपैकी एकावर प्राथमिक उपचार करून त्यास आरोग्य केंद्रामधून जाऊ देण्यात आले. दुस-या पर्यटकाला पुढील उपचारांसाठी म्हापसा येथील इस्पितळात नेण्यात आले. ही सगळी माहिती दृष्टी जीवरक्षक संस्थेने शनिवारी येथे जाहीर केली.

दरम्यान, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी दोन दिवसांपूर्वीच पर्यटन खात्याचे अधिकारी व राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन किनारपट्टीवरील सुरक्षेचा आढावा घेतला होता. किना-यांवर सध्या अनेक जीवरक्षक तैनात आहेत.

टॅग्स :goaगोवाTravelप्रवास31st December party31 डिसेंबर पार्टी