शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रद्द केलेल्या खाणलिजांकडून ‘सर्फेस व डेड रेंट’; पर्यावरणवादी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 10:26 IST

एकदा खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरविण्यात आल्यानंतर कुणी लीज धारक असतो का? परंतु खाण खात्याने नसलेल्या लिजधारकाला, लिजाचे अधिकार बहाल करण्यासाठी धडपड चालविल्याची धडपड चालविली आहे.

पणजी: एकदा खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरविण्यात आल्यानंतर कुणी लीज धारक असतो का? परंतु खाण खात्याने नसलेल्या लिजधारकाला, लिजाचे अधिकार बहाल करण्यासाठी धडपड चालविल्याची धडपड चालविली आहे. त्यांच्याकडून सर्फेस रेंट आणि डेड रेंट फेडून घेण्याचा सपाटा खाण खात्याने चालविला आहे. पर्यावरणवाद्यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. नूतनीकरण करून त्याच खाण मालकांना बहाल करण्यात आलेली ८८ खाण लिजे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली असली तरी या खाणलिजांच्या पूर्वीच्या लीजधारकांकडून सर्फेस रेंट आणि डेड रेंट वसुल करून घेणे सुरू आहे. आतापर्यंत १२ हून अधिक खाणलिजांचे दोन्ही प्रकारचे भाडे (रेंट) फेडून घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. याविषयी खाण खात्याच्या सहाय्यक संचालक नेहा पनवेलकर यांना विचारले असता त्यांनी खाण खाते केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत असल्याचे सांगितले. खाण लिजे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल ठरविण्यात आल्यानंतर हे सोपस्कार करणे बेकायदेशीर नव्हे काय असे विचारले असता त्यावर भाष्य देणे त्यांनी टाळले.  हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग ठरत असल्याचाही दावा पर्यावरणवादी करीत आहेत. दरम्यान पर्यावरण वाद्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. सरकार खाण लॉबीसाठी जे काही करणे शक्य आहे ते सर्व करीत असल्याचे गोवा फाउंडेशनचे क्लॉड आल्वारीस यांनी सांगितले. एनकेन प्रकारे उद्या ही खाणलिजे पूर्वीच्याच लीजधारकांना मिळेल यासाठी चालविलेही ही तजवीज असल्याचेही त्यांनी सांगितले. खाण विषयक तज्ज्ञ राजेंद्र काकोडकर यांनीही हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. खाण लिजांची हमी देण्यासाठी यापूर्वी जसे  लिजधारकांकडून स्टँपड्युटी फेडून घेण्यात आली होती तसाच हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिका-यांना धमक्यारद्द झालेल्या खाण लिजांचे डेड रेंट व सर्फेस रेंड फेडून घेणे हे बेकायदेशीर असल्याची कल्पना खाण खात्याच्या काही अधिकाºयांना आहे. त्यामुळे एका अधिका-याने ती फेडून घेण्यास नकार दिला असता त्याला बदली करण्याची व इतर कारवाईची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. काही खाणमाकांकडून फेडून घेतले व काही न घेतल्यामुळे इतर खाणमालक  नाराज झाले असल्याचेही वृत्त आहे.

टॅग्स :goaगोवा