शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जाहीरनाम्यासाठी गोव्यात ५० हजार लोकांकडून मागवल्या सूचना

By वासुदेव.पागी | Updated: March 2, 2024 15:36 IST

संकल्पपत्र रथयात्रेच्या शुभारंभावेळी भाजपची घोषणा

पणजी : भारतीय जनता पक्षाची देश्यापी संकल्प पत्र रथयात्रेची गोव्यातही सुरूवात झाली आहे. १५ मार्च पर्यंत मतदारांकडून सूचना मागवून नंतर त्या सूचनांच्या आधारे पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा बनविला जाणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी दिली. जाहीरनाम्यासाठी गोव्यातून किमान ५० हजार लोकांकडून सूचना पाठविण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला. 

जाहीरनामा बनविण्यापूर्वी लोकांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊन लोकांच्या मागणीनुसार जाहीरनामा बनविण्यात येणार आहे. त्यासाठी संक्पपत्र रथयात्रेचे आयोजन देशभर करण्यात आले आहे. गोव्यात रथयात्रेचे निमंत्रक हे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना बनविण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा होणार आहे असे तनावडे यांनी सांगितले. संकल्प पत्र रथ राज्याच्या सर्व मतदरसंघांतून फिरणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील लोकांकडून जाहीरनाम्याबाबतच्या  काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्यावा आणि त्या अनुशंगाने लोकांकडून सूचना मागवाव्यात असा हा यात्रेमागील उद्देश आहे. रथयात्रेच्या नियोजनानुसार लोकांना एक कार्ड देण्यात येत आहे.  लोकांनी त्यावर आपल्या सूचना लिहायच्या आहेत. या सूचना  केंद्राकडे पाठविल्या जाणार आहेत. लोक नमो या मोबाईल अँपवरूनही सूचना पाठवू शकतात.  गोव्यातून ५० हजार सूचनांची अपेक्षा आहे असे तानावडे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सर्वानंद भगत व इतर नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावेळी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही संकल्पयात्रा व्हँनला झेंडा दाखवून शुभारंभ केला. पणजीत शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात मडगाव येथून यात्रेच्या कामाची सुरूवात होणार आहे.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकBJPभाजपा