शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा, संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:45 IST

वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे. 

नारायण गावसपणजी : संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प लवकर सुरु करावा या मागणीसाठी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा.  मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्र्यांकडून यावर स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बसून राहण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला. वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी  दिला आहे. 

गेली अनेक वर्षे संजीवनी साखर कारखाना बंद आहे. संजीवनी साखर कारखाना बंद केला यामुळे आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक घेऊन हा साखर कारखाना सुरु करा अशी मागणी केली. आता सरकारने या ठिकाणी पीपीपी तत्त्वावर इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यालाही आम्ही  पाठिंबा दिला. पण अजूनही काहीच झालेले नाही. गेले चार दिवस आम्ही साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले पण कुणीच याची दखल घेतली नसल्याचे आज पणजीतील आझाद मैदानावर न्यायासाठी यावे लागले, असे यावेळी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

सरकारने सरळ भूमिका घ्यावीसरकारने  संजीवनी साखर कारखाना बंद होणार की पुन्हा सुरु करणार याची सरळ भूमिका घ्यावी. भागधारक शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊ नये. आता लोक शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. साखर कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादन कमी झाले आहे. सरकारने हा कारखाना स्वताही सुरु करत नाही तसेच पीपीपी तत्वावरही अद्याप सुरु कलेला नाही. फक़्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली जातात. या साखर कारखान्याचे जवळपास ७०० भागधारक शेतकरी आहेत. जर साखर कारखाना पुन्हा सुरु झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागणार आहे, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा भर उन्हात मोर्चाराज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर उन्हात मोर्चा सुरु केला.  जय जवान जय किसानचा नारा देत संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. यात अनेक महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करते असे सांगितले जाते, पण प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या मागणीकडे डोळेझाक केली जाते. आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांकडे ठोस आश्वासन मागत आहाेत. आम्ही सरकारच्या विरोधात नाही असेही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा