शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दहा तासांच्या प्रवासात शब्दही बोलली नाही; फक्त खिडकीतून बाहेर पाहायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2024 08:16 IST

चालक रेजॉन डिसोझा याची प्रसार माध्यमांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : थंड डोक्याने आपल्या चार वर्षीय मुलाची हत्या केलेल्या सूचनाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. मुलाचा मृतदेह बॅगेत कोंबून टॅक्सीने बंगळुरुला निघालेली सूचना दहा तासांच्या प्रवासात निःशब्द होती. फक्त खिडकीतून एकटक बाहेर पहायची, असे चालक रेजॉन डिसोझा याने प्रसार माध्यमांकडे बोलताना सांगितले.

सूचना ही संवेनदनाशून्य बनली होती. बंगळुरुला जाताना वाटेत तिने ब्रेकफास्टही घेतला. तेव्हादेखील तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसले नाहीत, असे चालकाने सांगितले. रेजॉन याच्या सजगतेमुळे तसेच त्याने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली.

बंगळुरुला जाताना वाटेत चोर्ला येथे वाहतूक कोंडीमुळे सुमारे पाच तास टॅक्सी अडकली. वाहतूक पाच ते सहा तास सुरळीत होणार नाही, अशी कल्पना आपण सूचना हिला दिली व हवे तर माघारी फिरून मोपा किंवा दाबोळी विमानतळावर सोडतो, असेही सांगितले. परंतु तिने ऐकले नाही. आपल्याला बंगळुरुपर्यंत टॅक्सीनेच प्रवास करायचा आहे, असे तिने चालकाला सांगितले.

पतीसोबतच्या ताणलेल्या सबंधांबाबत 'तिने' टिश्यू पेपरवर केली नोंद

चार वर्षीय मुलाची हत्या करणारी निर्दयी सीईओ माता सूचना सेठ हिच्या सामानातून पोलिसांना टिश्यू पेपर आढळला, ज्यावर तिने पतीसोबतच्या ताणलेल्या संबंधांबाबत आयलायनरने मजकूर लिहिल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी या चिठ्ठीचा नेमका मजकूर उघड केला नसला तरी, सूत्रांचे म्हणणे आहे की संशयित सूचना हिने आपल्या विभक्त पतीसोबतच्या ताणलेल्या संबंधांबद्दल लिहिले आहे. आयलाइनरने त्यावर लिहिले असून हस्ताक्षर तज्ञांद्वारे ही चिठ्ठी तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवण्यात आली आहे. चिठ्ठीतून ती तिचे पती व्यंकट रमणसोबतच्या ताणलेल्या नातेसंबंध आणि रमणला मुलाला भेटण्याची परवानगी दिल्याने न्यायालयाच्या आदेशावर नाखुश होती हे सूचित होते. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी