शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वीज सुधारणांसाठी भूमिगत वीज वाहिन्या हाच पर्याय : मडकईकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 19:24 IST

राज्यात वीज पुरवठ्याची जी समस्या दिसून येते, तो जुन्या साधनसुविधांचा परिणाम आहे.

पणजी : राज्यात वीज पुरवठ्याची जी समस्या दिसून येते, तो जुन्या साधनसुविधांचा परिणाम आहे. वेळच्या वेळी वीज साहित्याची खरेदी न झाल्याने व अनेक जुने ट्रान्सफॉर्मर वादळ-वा-यामुळे निकामी ठरत असल्याने वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होते. यावर भूमिगत वीज वाहिन्या हाच उपाय व पर्याय ठरत असल्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

भूमिगत वीज वाहिन्या देखील बांधकाम कंत्राटदार तोडून टाकतात व त्यामुळे पणजीत समस्या निर्माण होते. सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा विभाग तसेच मलनिस्सारण विभाग आदी विभागांच्या कंत्राटदारांकडून रस्ते वाट्टेल तसे खोदले जातात. वीज वाहिन्यांची पर्वा केली जात नाही. वीज तुटल्यानंतर मग त्यावर माती टाकून ते पसार होतात. यामुळेही वीज पुरवठा ठप्प होतो, असे मंत्री मडकईकर म्हणाले. राज्यात जिथे वन क्षेत्र आहे, अशा 1 हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रत एरियल बंच केबलिंगचे काम सध्या सुरू आहे, असेही मडकईकर यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने वीज क्षेत्रतील सुधारणांसाठी एकूण 1 हजार 70 कोटींचा निधी तत्त्वत: मंजुर केला आहे. यापुढे आम्ही तपशीलवार प्रस्ताव पाठवू. सरकारने पाचशे कोटींच्या कामांच्या निविदा नुकत्याच जारी केल्या आहेत. वेर्णा, कळंगुट, साळगाव, साळ, बादे- शिवोली, करासवाडा अशा भागांमध्ये नवी वीज उपकेंद्रे उभी केली जातील. कळंगुटच्या केंद्रावर 186 कोटींचा खर्च येणार आहे तर वेर्णाला 120 कोटींचा खर्च केला जाईल. कदंब वीज उपकेंद्राचा दर्जा वाढविला जाईल. 4 कोटींचे नवे कंडक्टर्स खरेदी केले जाणार आहेत. तीन हजार वीज खांबे खरेदी केले आहेत. चौदा नवे वीज ट्रान्सफॉर्मर खरेदी केले जातील. केंद्राने डाटा सेंटरसाठी 90 कोटी रुपये वीज खात्याला दिले आहेत. 99 टक्के काम पूर्ण झाले आहे, असे मंत्री मडकईकर यांनी सांगितले. 

कुंकळ्ळीत 7.75 कोटींची कामेदरम्यान, कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफास डायस यांनी वीज समस्येविरुद्ध बंदची हाक दिली आहे, त्याविषयी बोलताना मंत्री मडकईकर म्हणाले, की कुंकळ्ळीत एकूण 7.75 कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी इस्टीमेट तयार झाला आहे. आमदार डायस हे माङयाकडे कधीच वीजविषयक कामे घेऊन आले नाहीत. विधानसभेत बोलले म्हणून कामे होत नाहीत. त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. कुंकळ्ळीत 554 वीज खांब बदलले जातील. 5.3 किलोमीटरसाठी नवी उच्चदाबाची वीज वाहिनी टाकली जाईल. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत वीजविषयक 11 कोटींची कामे करण्यासाठी आदेश दिला आहे. ही सगळी कामे सुरू असताना आमदार डायस यांनी बंदची हाक द्यावी हे त्यांचे अपयश व नैराश्य दाखवून देते, असे मडकईकर म्हणाले.