शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत अहवाल सादर करा; आमदार सरदेसाईंच्या पत्राची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:08 IST

उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतल्यानंतर सार्वजनिक गाऱ्हाणी विभागाने दक्षता खाते व डीजीपींना येत्या १५ दिवसांत या प्रकरणात काय कारवाई केली यासंबंधीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

गोवा फारवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या कथित भरती घोटाळा प्रकरणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गृहमंत्रालयाने गोवा सरकारकडे विचारणा केली. त्यानंतर वरील अहवाल सादर करण्यास बजावले आहे.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की राज्य सरकारने मार्च २०२१ मध्ये उपनिरीक्षक भरतीसाठी जाहिरात दिली. त्यानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी झाली. सरदेसाई यांचा असा दावा आहे की, व्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसून येत आहे की, या चाचणीत नापास झालेल्यांनाही नंतर उत्तीर्ण जाहीर करण्यात आले. सरदेसाई म्हणतात की, 'प्रारंभी दोन उमेदवारांबाबत असा प्रकार घडल्याचे आढळून आले; परंतु नंतर आणखी सहा जणांना अशाच प्रकारे उत्तीर्ण केल्याचे उघड झालेले आहे.'

सरदेसाई यांचा असा दावा आहे की कॉन्स्टेबलच्या चाचणीत ज्या उमेदवारांना १५ ते ३० गुण मिळाले, त्यांना दुसऱ्याच दिवशी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या भरतीत ८३ ते ९९ गुण देण्यात आले. फोंडा, वाळपई, मडगांव व पणजीत दोन ठिकाणी मिळून पाच ठिकाणी पीएसआय शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. त्यावर ७० लाख रुपये खर्च करण्यात आले. या भरती घोटाळ्याबाबत अनेक तक्रारी करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहावे लागले.

हा तर मेगा घोटाळा...

आमदार सरदेसाई म्हणाले की, 'याआधी डिसेंबर २०२१मधील पोलीस भरतीवेळीही गैरप्रकार घडले आहेत. कॉन्स्टेबलच्या परीक्षेत नापास झालेल्या उमेदवाराला नंतर उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत ९९ गुण देण्यात आले.. कर्नाटकातही भरतीत असाच घोटाळा झाला होता. तेथे घोटाळा करणारे तुरुंगात आहेत आणि गोव्यात मात्र घोटाळेबाज मोकाट फिरत आहेत. पीएसआय भरती घोटाळा हा मेगा घोटाळा आहे अशी टीका त्यांनी केली. 

जून २२ मध्येच आला अहवाल

या प्रकरणी सुरुवातीला पोलीस अधिकारी नेल्सन अल्बुकर्क यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. आल्बुकर्क यांनी १५ जून २०२२ रोजी अहवाल दिला. तो अहवाल तसेच नंतर पाच समित्यांनी सप्टेंबरमध्ये दिलेला अहवाल सरकारने जनतेसाठी उघड केलेला नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस