शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीपूर्वीच खोलली गोव्यातील स्ट्रॉंगरूम, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 22:22 IST

 एकदा मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूमध्ये ठेऊन दरवाचा बंद केला की तो नंतर मतमोजणीच्या दिवशीच उघडला जातो, परंतु उत्तर गोव्यातील स्ट्रॉंगरूम निवडणूक अधिका-यांना शनिवारी खोलावी लागली.

पणजी:  एकदा मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूमध्ये ठेऊन दरवाचा बंद केला की तो नंतर मतमोजणीच्या दिवशीच उघडला जातो, परंतु उत्तर गोव्यातील स्ट्रॉंगरूम निवडणूक अधिका-यांना शनिवारी खोलावी लागली. स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही सर्व्हेलन्समध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे तो खोलण्यात आला. 

दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात मिळून ४३  स्ट्रॉंगरूम बनविण्यात आले आहेत.  उत्तर गोव्यात एकूण २२ स्ट्रॉंगरूम आहेत. त्यापैकी मांद्रे  मतदारसंघातील स्ट्रॉंगरूमला देण्यात आलेले सीसीटीव्ही कॅम-यांचे सर्व्हेलन्स बिघडल्याचे सकाळी निवडणूक कार्यालयाच्या तांत्रिक विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे स्ट्रॉंगरूम खोलून ते दुरूस्त करणे आवश्यक होते. मांद्रे मतदारसंघातील सर्व उमेदवारांचे प्रतिनिधींना बोलवून घेऊन व जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूमचा दरवाचा खोलण्यात आला. तसेच मांद्रे मतदारसंघासाठीच्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमे-यात झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला व नंतर स्ट्रॉंगरूम पुन्हा बंद करण्यात आला. 

एकदा  मतदान यंत्रे  स्ट्रॉंगरूममध्ये ठेवून तो बंद केल्यानंतर निकालाच्यापूर्वी तो  खोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचे कारणही वेगळे आहे. यापवूर्वी एकच स्ट्रॉंगरूम केला जात होता व त्यात सर्व मतदारसंघातील मतदानयंत्रे ठेवण्यात येत होती. आता प्रत्येक मतदारसंघासाठी एक मतदानयंत्र मिळून  ४० स्ट्रॉंग रूम आणि शिवाय तीन विधानसभेचे मिळून ४३ स्ट्रॉंगरूम करण्यात आले होते व प्रत्येक स्ट्रॉंगरूमसाठी सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले होते. त्यामुळे एखाद्या स्ट्रॉंगरूमचे सीटीटीव्ही कॅमरे जरी बिघडले तरी पुन्हा स्ट्रॉंगरूम खोलावा लागणार आहे. कारण स्ट्रॉंगरूमना इलेट्रॅानिक सुरक्षा ही महत्त्वाची आहे. 

स्ट्रॉंगरूमला  तिहेरी सुरक्षा कवच देण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्ट्रॉंंगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. तसेच स्ट्रॉंगरूमच्याबाहेर निमलष्करी दळाच्या जवानांचे सुरक्षाकडे आहे. आल्तिनो येथील ज्या सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालाच्या इमारतीत हा स्ट्रॉंग रूम बनविण्यात आला आहे. त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर गोवा पोलिसांची सुरक्षा आहे. म्हणजेच एखाद्याने ईव्हीएम सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केलाच तरी त्याला अशा तीन सुरक्षाफळी भेदाव्या लागतील जी गोष्ट केवळ अशक्य आहे असा दावा निवडणूक अधिका-याने केला आहे.

टॅग्स :goaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक