शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गोव्यात शैक्षणिक प्रवेशावर कडक निर्बंध, मार्गदर्शक तत्त्वे जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 22:48 IST

प्राथमिक, मिडल स्कूल तसेच हायस्कूलमधील प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कडक निर्बंध लागू करताना शिक्षण खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

पणजी : प्राथमिक, मिडल स्कूल तसेच हायस्कूलमधील प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कडक निर्बंध लागू करताना शिक्षण खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यालयापासून ठराविक अंतरापर्यंत निवास करणा-या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी निकषही निश्चित करण्यात आले आहेत. प्रवेशासाठी उमेदवार किंवा पालकांच्या तोंडी अथवा लेखी मुलाखती घेण्यास मनाई करण्यात आली आहे. अंतराप्रमाणे गुण ठरवून देताना प्रवेशासाठी व्यवस्थापनांना २0 टक्के कोटा देण्यात आला आहे. कोणत्याही स्थितीत जादा फी किंवा कॅपिटेशन फी आकारण्यास मनाई आहे. शिक्षण खात्याने स्वत:कडे १0 टक्के जागांचा कोटा ठेवला आहे.२0१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून ही नवी मार्गदर्शक तत्त्वें लागू होणार असून, सर्व अनुदानित विद्यालयांच्या प्रमुखांना परिपत्रक रवाना झाले आहे. शहरांमधील शाळा, विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक गर्दी करतात. ग्रामीण भागातील शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत त्यामुळे सरकारने ही पावले उचलली आहेत. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक राहणार असल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी सांगितले. प्रवेशासाठी अंतरानुसार गुण दिले जाणार असून ज्याला जास्त गुण मिळतील त्याला प्राधान्य दिले जाईल. याशिवाय प्रवेशच्छुकाची भाऊ किंवा बहीण त्याच शाळेत शिकत असल्यास १0 गुण, पालक जर शाळेचे जुने विद्यार्थी असतील तर १0 गुण मिळतील तर शाळेचे विशेष गुण २0 असतील.यनव्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्वकल्पना पालकांना द्यावी, असे व्यवस्थापनांना बजावण्यात आले आहे. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असल्यास तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य उपक्रमांमध्ये अथवा प्रश्नमंजुषा किंवा तत्सम उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी केली असल्यास प्राधान्य दिले जाईल. माजी सैनिकांच्या मुलांनाही प्रवेशात प्राधान्य असणार आहे. पाल्यांच्या प्रवेशाच्यावेळी पालकांनी आधार कार्ड, निवासाचा दाखला, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, निवासाबाबतचा मालमत्ता कराची पावती, रेशन कार्ड आदी दस्तऐवज सादर करावे लागतील. पालक जर संबंधित शाळेचे जुने विद्यार्थी असतील तर त्यांनी तसा दाखला सादर करावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वैद्यकीय दखला सादर करावा लागेल. राखीव गटात प्रवेश घेऊ इच्छिणा-यांनी योग्य अधिकारिणीने दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.शाळेत मोबाइल वापरावर बंदीशाळेत शिक्षक किंवा विद्यार्थ्यांनी मोबाइल फोन वापरण्यास बंदी घालणारे आणखी एक परिपत्रक शिक्षण खात्याने काढले आहे. याआधी सक्त निर्देश देऊनही काही शिक्षक स्मार्ट फोन वापरतात तसेच विद्यार्थ्यांनाही काही गोष्टी डाउनलोड करावयास सांगतात व त्यातून कंपन्यांकडून स्वत:चा फायदा करून घेतात, असे खात्याच्या निदर्शनास आले आहे. तिन्ही शैक्षणिक विभागांमधील शिक्षण उपअधिकारी शाळांना आकस्मिक भेट देणार असून अशा गोष्टी आढळल्यास कडक कारवाइ केली जाईल. सर्व अनुदानित प्राथमिक शाळा, मिडल स्कूल, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा