शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी, भाजपमध्ये उत्साह

By किशोर कुबल | Updated: April 14, 2023 17:36 IST

येत्या रविवारी जाहीर सभेला २५ हजार लोक जमणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास.

पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या येत्या रविवार १६ रोजी गोव्यात फर्मागुडी येथे होणार असलेल्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरु आहे. आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फर्मागुडी येथे जीईसी मैदानाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते. शहा यांच्या सभेला २५ हजार लोक जमवू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा गोवा दौरा आहे. फर्मागुडी येथील इंजिनिरिंग कॉलेजच्या मैदानावर रविवारी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकीयांना संबोधित करणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकांचे रणशिंग यापूर्वीच फुंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी राष्ट्रीय नेत्यांनी देशातील राज्याचे दौरे सुरू केले आहेत. भाजपाचे संघटन निवडणुकीच्या कामाला लागले असून सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते आत्तापासूनच कामाला लागले आहेत.

शाह यांच्या या दैऱ्याकडे राजकीय विश्लेषकांसह नागरीकांचे लक्ष लागले असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला गोमंतकीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

टॅग्स :goaगोवाAmit Shahअमित शाह