शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सुकूर टँकरप्रकरणी कडक कारवाई; सुभाष शिरोडकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 14:23 IST

सर्वस्वी टँकर्सवर अवलंबून असताना हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यावर लोकांची झोपच उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सुकूर येथे पाण्याचा टैंकर सांडपाण्यासाठी वापरण्याचा संतापजनक प्रकार घडल्याच्या प्रकाराची जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंत्र्यांनी या प्रकरणी अहवाल मागवला आहे. तिळारीचे पाणी बंद असल्याने आधीच पर्वरीवासीय पाण्यासाठी व्याकूळ बनले असून, सर्वस्वी टँकर्सवर अवलंबून असताना शनिवारी हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यावर लोकांची झोपच उडाली आहे.

याआधी सांकवाळ येथे तेथील रहिवाशांनी असाच एक टैंकर पकडून दिला होता. पिण्याचे पाणी पुरवण्यासाठीचे टँकर्स हॉटेल, कॅसिनो तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी वापरले जात आहेत. अशा टँकर्समधून आणलेले पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्यास धोका पोहोचू शकतो, त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. साकवाळचे प्रकरण विधानसभेत गाजले होते. त्यानंतर प्रत्येक पाणीवाहू टँकरला कोड दिला जाईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले होते.

अधिकृत माहितीनुसार, राज्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे ८५० नोंदणीकृत टँकर्स आहेत. प्रत्यक्षात ही संख्या याच्या कितीतरी पटीने जास्त असू शकते. सांकवाळच्या घटनेनंतर सरकारने पाणीवाहू टँकर्सना नोंदणी सक्तीची केली असून, प्रत्येक पाणीवाहू टैंकरला कोड दिला जाणार आहे. ही प्रक्रिया सध्या चालू आहे. दुसरीकडे ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राज्यात असून, सांडपाणी वाहून नेणारे १७० नोंदणीकृत टँकर्स असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई: जलस्रोतमंत्री

याबाबत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मी या प्रकरणी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने अहवाल मागवला आहे. आज, सोमवारपर्यंत हा अहवाल मिळणार असून, त्यानंतर कडक कारवाई केली जाईल. पाणीवाहू टँकरना कोड देण्याची प्रक्रिया चालू आहे. 'कोड' दिल्यानंतर हे प्रकार नियंत्रणात येतील. सरकार अशा प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी