शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

अरबी समुद्रात वादळ

By admin | Updated: June 12, 2014 01:28 IST

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्ट्याचे वादळी वाऱ्यात रूपांतर झाले असून ‘नानौक’ वादळ ७२ तासांत ओमान किनाऱ्याला

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्ट्याचे वादळी वाऱ्यात रूपांतर झाले असून ‘नानौक’ वादळ ७२ तासांत ओमान किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. समुद्रात गोव्यापासून जवळच या वादळाची निर्मिती होणार असली, तरी सद्यस्थितीत गोवा किंवा कोकण किनाऱ्याला धोका नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गोव्यात मान्सून दाखल झाला असल्याची अधिकृत घोषणा वेधशाळेने केली आहे. येथील हवामान वेधशाळेच्या हंगामी संचालक व्ही. के. मिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११.३0 वाजता अरबी समुद्रात पूर्व-मध्य भागात कमी दाबाचा मोठा पट्टा निर्माण होऊन पहाटे ५.३0 वाजता त्याचे ‘नानौक’ वादळात रूपांतर झाले. हे वादळ मुंबईपासून समुद्रात ६६0 कि. मी. अंतरावर नैर्ऋत्येकडे सरकले आहे. गुजरातमधील वेरावल किनाऱ्यापासून ५९0 कि. मी. सागरी अंतरात पुढे सरकले आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन समुद्रात पुढे सरकत ७२ तासांत ओमान किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. गोव्यात बुधवारी मान्सून दाखल झाल्याचे हवामान वेधशाळेने अधिकृतपणे जाहीर केले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात मान्सूनला विलंब झाला होता. आगामी २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)