शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
2
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
3
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
4
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
5
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
6
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
7
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
9
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
10
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
11
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
12
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
13
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
15
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
16
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
17
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
18
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
19
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
20
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

राज्य कर्जाच्या खाईत

By admin | Published: March 24, 2017 2:36 AM

पणजी : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला आहे. २0१२

पणजी : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला आहे. २0१२ पासूनची ही कर्जवाढ ७४.८८ टक्के इतकी आहे. वेगवेगळ्या सवलती तसेच योजनांच्या माध्यमातून वाटली जाणारी आर्थिक खिरापत आणि विशेष म्हणजे विकासकामांवर आवश्यकतेपेक्षा जास्त होणारा वायफळ खर्च राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरला आहे.विधानसभेत सादर केलेल्या २0१६-१७च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षअखेर म्हणजेच ३१ मार्च २0१६ रोजी राज्याचे कर्ज १0,९४५ कोटी ३८ लाख रुपये इतके होते. येत्या ३१ मार्चपर्यंत कर्ज १२,०१८ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. वर्षभरातील कर्जवाढ १0३ कोटी ७८ लाख रुपये इतकी आहे.२0१२ साली राज्याच्या डोक्यावर ६,८७२ कोटी ३६ लाख रुपये कर्ज होते. गेल्या पाच वर्षांच्या काळात आर्थिक तूटही वाढली आहे. २0१२-१३ मध्ये ती १,१३७ कोटी ३६ लाख रुपये होती. आज आर्थिक तूट २,००१ कोटी ८३ लाख रुपयांवर पोहोचली आहे.स्टॅट्युटरी लिक्विडिटी आधारित खुल्या बाजारपेठेतील कर्जही वाढले आहे. एसएलआर आधारित बाजारपेठेतील कर्ज २0१३ साली ४६.५४ टक्के होते, ते या आर्थिक वर्षात ५९.४२ टक्क्यांवर पोहोचले आहे.जलक्रीडा धोरणाचा मसुदा कायदा खात्याकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. कॅसिनोंसाठी विशेष बोटी, ट्रान्सशिपरर्सच्या नोंदणीसाठी नियम तयार केले जातील. मांडवी, जुवारी, म्हापसा आदी ठिकाणी सागरमाला योजनेंतर्गत ११ जेटी बांधल्या जातील, असे अहवालात म्हटले आहे.दोनापावल-वास्को जलदगती बोटसेवा अंतिम टप्प्यात आहे. कुंडई येथे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी १0 हजार चौरस मीटर जमीन शोधण्यात आली आहे. प्रकल्प अभ्यासार्थ तज्ज्ञांचे पथक नेमण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. (प्रतिनिधी)