शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटींना मिळाली 'गॅरंटी'; राजकीय आरक्षणासाठी संसदेत नवीन कायदा आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2024 10:53 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची मंत्री पियुष गोयल यांच्याकडून माहिती.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात एसटींना विधानसभेत, आरक्षणासाठी संसदेत नवीन कायदा आणला जाईल. प्रस्तावित विधेयकात गोवा राज्यातील अनुसूचित जमातींना संविधानाच्या कलम ३३२ नुसार हमी दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची तरतूद आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.

गोयल म्हणाले की, कायदा आणि न्याय मंत्रालयातर्फे हे विधेयक संसदेत आणले जाईल. गोव्यात एसटींना विधानसभेत आरक्षण नव्हते. केंद्र सरकारकडे या मागणीचा राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील वंचित, पीडीतांना नेहमीच न्याय देत असतात. गोव्यात आजवर एसटी समाजाच्या लोकांची संख्या कमी असल्याच्या सबबीखाली राजकीय आरक्षण मिळाले नव्हते. गावडा, कुणबी, वेळीप यांना उशीरा एसटींचा दर्जा देण्यात आला, त्यामुळे आता राज्यात या समाजाची लोकसंख्या दीड लाख आहे.

गोव्यातील एसटींना विधानसभेत आरक्षण देण्यासाठी नवीन कायदा आणण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जनगणना आयोग एसटींची संख्या अधिसूचित करेल व त्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगाला फेररचनेचे अधिकार दिले जातील व विधानसभेत एसटींना आरक्षण दिले जाईल. 

निवडणूक अनुसूचित लोकसंख्येची आयोग जमातीच्या सुधारित आकडेवारी विचारात घेईल आणि संविधानाच्या कलम १७० आणि ३३२ तसेच आणि २००२ च्या फेररचना कायद्यातील कलम ८ मधील तरतुदींचा विचार करून विधानसभा मतदारसंघांची फेररचना करील. फेररचनेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग स्वतःची कार्यपद्धती निश्चित करेल आणि त्याला दिवाणी न्यायालयाचे काही अधिकार असतील.

गोव्यातील अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी, संसदीय आणि विधानसभा मतदारसंघाच्या परिसीमन आदेश, २००८ मध्ये दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी निवडणूक आयोगाला अधिकार देणाऱ्या तरतुदी विधेयकात असतील. २००१ च्या जनगणनेनंतर ज्या जमातींना अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यांची लोकसंख्या विचारात घेऊन गोवा राज्यातील अनुसूचित जमातींचीलोकसंख्या निश्चित करण्याचे अधिकार जनगणना आयुक्तांना दिले जातील.

सरकारकडून पाठपुरावा

एसटी बांधवांनी विधानसभेत 3 राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. ओबीसी महासंघानेही त्यांना काल आंदोलनास पाठिंबा दिला होता. एसटी आरक्षणाचा विषय 3 विधानसभा अधिवेशनात गाजला होता त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः तसेच नंतर एसटींच्या शिष्टमंडळालाही सोबत घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांना भेटले होते.

आम्ही शब्द पाळला : मुख्यमंत्री सावंत

केंद्राचा निर्णय हा गोव्यातील एसटी समाजाचा मोठा विजय आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप यांचा एसटीमध्ये समावेश भाजप सरकारच्या कार्यकाळात झाला होता. एसटीना विविध स्तरावर आरक्षणही भाजप सरकारनेच दिले व आता विधानसभेतही भाजप सरकारच आरक्षण देईल. आम्ही दिलेला शब्द पाळतो, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी काँग्रेस पक्ष मात्र फक्त एसटीप्रश्नी राजकारण खेळत असल्याची टीकाही केली.

गोव्यातील एसटी समाजाला विधानसभा मतदारसंघांचे आरक्षण देणार हा शब्द मोदी सरकार पाळत आहे. ही मोदींची गॅरंटी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही सर्वजण भेटलो होतो तेव्हा त्यांनीही शब्द दिला होता. त्यानुसार केंद्र सरकार पाऊले उचलत आहे. एसटी समाजाला आरक्षण देणारच हा शब्द केंद्राने पाळलाय. - सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार.

 

टॅग्स :goaगोवाreservationआरक्षणpiyush goyalपीयुष गोयल