शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा खात्याचे मंत्री खंवटेंकडून वाभाडे, खेळाडूंची उपेक्षा न करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 22:41 IST

क्रीडा खात्याला चांगले मंत्री लाभले आहेत. मात्र त्या खात्याच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना खेळ व खेळाडूंविषयी काही कळते की नाही, असा प्रश्न करत राज्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी विधानसभेत खंटवे यांनी खात्याच्या कारभाराचे वाभाडेच काढले.

पणजी : क्रीडा खात्याला चांगले मंत्री लाभले आहेत. मात्र त्या खात्याच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना खेळ व खेळाडूंविषयी काही कळते की नाही, असा प्रश्न करत राज्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी विधानसभेत खंटवे यांनी खात्याच्या कारभाराचे वाभाडेच काढले. फाईल्स केवळ फिरवत ठेवत खेळाडूंची उपेक्षा करू नका, असा सल्ला मंत्री खंवटे यांनी दिला.यश फडते या गोमंतकीयाने अमेरिकेत ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकाविले. क्रीडा खाते तथा सरकारने त्याच्यासाठी काही केले नाही. त्याच्या वडिलांनी खूप कष्ट घेतले, असे मत काही आमदारांनी मांडले. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी फडते याच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. आपण यशच्या वडिलांना सलाम करतो, असे काब्राल म्हणाले.वास्कोचे आमदार कालरुस आल्मेदा यांनीही त्याचे कौतुक केले. मंत्री माविन गुदिन्हो यांनीही फडते याच्या यशाविषयी गौरवोद्गार काढले. खेळाडूंना सरकारकडून प्रोत्साहन हवे असते, असे सांगत काँग्रेसचे आमदार नीळकंठ हळरणकर यांनीही फडते याच्या कामगिरीचे कौतुक केले. मंत्री खंवटे यांनी क्रीडा खात्याच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. क्रीडा खाते हे योग्य मंत्र्याकडे आहे पण या खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांना खेळाडू व खेळ म्हणजे काय ते शिकविण्याची वेळ आली आहे. त्यांना काही सोयरसुतकच नाही.राज्यात चमकणारे खेळाडू मग अचानक कुठे गायब होतात, त्यांच्या आयुष्याचे पुढे काय होते हे त्या खात्याने जाणून घ्यावे. त्यांनी बॉक्सिंग संघटनेच्याही एका फाईलचे उदाहरण दिले. तीन वर्षे फाईल फिरत राहते, असे मंत्री खंवटे यांनी सांगून लवकर निर्णय व्हावे म्हणून आम्ही किती म्हणून डोके आपटावे असा प्रश्न संतप्त होत विचारला. खात्याच्या खालच्या स्तरावरील जे अधिकारी आहेत, त्यांचा कारभार सुधारायला हवा, असे खंवटे म्हणाले. मंत्री बाबू आजगावकर यांनीही यश फडते याचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या खेळाडूंचा अभिमान वाटतो असे आजगावकर म्हणाले व मंत्री खंवटे यांनी मांडलेले मुद्देही त्यांनी मान्य केले. अशा प्रकारच्या खेळाडूंकडे खात्याच्या संचालकांनी लक्ष द्यायला हवे. आम्ही अशा खेळाडूंना काहीच कमी पडू देऊ नये. सरकार आपल्या मागे नाही असे अशा खेडाळूंना वाटता कामा नये. आमदारांनी यश फडते यास आपल्याकडे घेऊन यावे. सरकारच्यावतीने मदत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व काही करीन, असे मंत्री आजगावकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा