शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

उष्म्यावर पावसाचा शिडकावा; राज्यात अनेक ठिकाणी वादळवारे, गडगडाटासह लावली हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 12:58 IST

पावसामुळे प्रचंड वाढलेल्या उष्म्यापासून गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात काल, शनिवारी अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे प्रचंड वाढलेल्या उष्म्यापासून गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे. 

सत्तरी, डिचोली, बार्देश, तिसवाडी, मुरगाव, पेडणे, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यात पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वास्को, मडगाव, सांगे, धारबांदोडा, जुने गोवे, पणजी, म्हापसा आणि सत्तरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. इतर ठिकाणीही पाऊस पडणार असल्याचे संकेत होते. 

वादळवाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझडीच्याही घटना आहेत. अग्निशामक दलाला विविध भागांतून मदतीसाठी १०० हून अधिक कॉल्स आले होते. मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत होते. वेधशाळेतील रडारद्वारे टिपण्यात आलेल्या आकाशाच्या छायाचित्रात पावसाचे ढग निर्माण होण्याची प्रक्रिया होत असल्याचे आढळून आले होते.

ही प्रक्रिया गतिमान होऊन पुढील चार दिवसांत त्याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. विशेषतः गोवा आणि कोंकण भागात पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुरगाव तालुक्यालाही झोडपले. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पुर्ववत झाला नव्हता. पावसामुळे मुंडवेल-वास्को येथील वीज वाहिनीवर माड कोसळले. त्याचबरोबर सत्तरी, वाळपई परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांचीतारांबळ उडाली.

शनिवारी पणजीत कमाल ३४.४ अंश तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर मुरगाव येथील कमाल तापमान ३४ अंश व किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असे राहिले. पुढील ४८ तासात कमाल तापमानात घट होईल असा अंदाज आहे. गोव्यात तापला तरी अधिकत प्रमाणात सापेक्षिक आर्द्रतेमुळे उष्याचा त्रास अधिक होत आहे. राज्यात १२ ते १७ मे दरम्यान सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

आज, उद्या वादळवारे

रविवारी आणि सोमवारी गोव्यात वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यासाठी दोन दिवस पिवळा अलर्टही जारी करण्यात आला आहे. १४ ते १७ मे दरम्यानही या पावसाच्या सरी कोसळणे चालू राहील, असेही अंदाजात म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस