किनाऱ्यांच्या साफसफाईवर २१ दिवसांच्या काळात ६१ लाख खर्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 02:26 PM2019-01-21T14:26:52+5:302019-01-21T14:27:12+5:30

सर्वांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या कळंगुट किनाऱ्यासह हरमल, मोरजी, मांद्रे, हणजुण, वागातोर, बेतालभाटी, कोलवा, पाळोळें आदी लौकीकप्राप्त किनारे गोव्यात आहेत. 

Spending 61 million for coastal clean-up during the 21-day period | किनाऱ्यांच्या साफसफाईवर २१ दिवसांच्या काळात ६१ लाख खर्च 

किनाऱ्यांच्या साफसफाईवर २१ दिवसांच्या काळात ६१ लाख खर्च 

Next

पणजी : गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे काम मध्यंतरी दृष्टी लाइफ सेविंग कंपनीने बंद केल्यानंतर या २१ दिवसांच्या काळात किनारा सफाईच्या कामावर ६१ लाख रुपये पर्यटन विकास महामंडळाने खर्च केले. 


गेल्या १३ नोव्हेंबर रोजी कंत्राट संपल्याच्या कारणास्तव कंपनीने किनाऱ्यांवरील सफाई कामगार मागे घेतले. कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग पसरल्याने स्वत:च्याच सरकारविरुध्द आवाज उठविला. या काळात किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने सरकारसमोर किनारा साफईची पर्यायी व्यवस्था करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पर्यटन खात्याला २00 कामगार नेमून किनारा सफाईची व्यवस्था स्वत: करावी लागली.


सर्वांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या कळंगुट किनाऱ्यासह हरमल, मोरजी, मांद्रे, हणजुण, वागातोर, बेतालभाटी, कोलवा, पाळोळें आदी लौकीकप्राप्त किनारे गोव्यात आहेत. 


किनाऱ्यांच्या साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून घ्यावे आणि कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे ते सोपवावे, अशी लोबो यांची मागणी आहे. किनाऱ्यांवरील कचरा व्यवस्थापन हाताळण्याची किंवा त्यासंबंधीची कंत्राट देण्याची कोणतीही पात्रता पर्यटन खात्याकडे नाही. याउलट गोवा घन कचरा महामंडळाकडे २२ अभियंते आहेत यातील ४ अभियंते कचरा विषयातील तज्ज्ञ आहेत. तसेच पुरेसा कर्मचारीवर्ग महामंडळाकडे आहे. कचरा विषयक कंत्राट देण्याचे काम हे महामंडळच योग्यरीत्या बजावू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.


गेली दोन वर्षे दृष्टी लाइफ सेविंग  कंपनीचे कर्मचारी गोव्यातील किनाऱ्यांची सफाई करीत आहे. मध्यंतरी २१ दिवस गोंधळ निर्माण झाल्यानंतर पुन: याच कंपनीकडे काम देण्यात आलेले आहे. या कामाच्या निविदा काढण्यात आला असून लवकरच कंत्राट दिले जाणार आहे.

Web Title: Spending 61 million for coastal clean-up during the 21-day period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा