लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : दसरा-दिवाळी सणानिमित्त गर्दीचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने खास साप्ताहिक रेल्वेचे नियोजन केले असून प्रवाशांच्या सोयीसाठी मडगावमार्गे विशेष गाडी क्र. ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपूरम-लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक विशेष) रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम - (साप्ताहिक) ०१४६३ क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी दुपारी ४ वा. सुटेल. तिरुवनंतरपुरम येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वा. पोहचेल. ०१४६४ क्रमांकाची गाडी तिरुवनंतपुरमहून २७सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी दुपारी ४.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्यादिवशी रात्री १ वा. पोहचेल. ही गाडी थिवी, करमळी व मडगाव या स्थानकांवर थांबा घेईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ०११७९ या क्रमांकाची रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून १७ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी सकाळी ८:२० वा. सुटेल व सावंतवाडी येथे त्याच दिवशी रात्री ९ वा. पोहचेल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.