शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

उभयचर बसचा मार्ग मोकळा, गोव्यात पर्यटकांचे ठरणार विशेष आकर्षण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 14:57 IST

पणजी - पर्यटकांचे आकर्षण ठरणार असलेल्या उभयचर बसचा मार्ग केंद्राने अधिसूचना काढल्याने मोकळा झाला असून चालू महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर ती व्यावसायिक वापरात आणली जाईल आणि मार्चअखेरपर्यंत तिकिटे लावून पर्यटकांना या बसमधून सफरीचा आनंद लुटता येईल.  पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली. प्रात्यक्षिक घेऊनही गेल्या दीड वर्षाहून ...

पणजी - पर्यटकांचे आकर्षण ठरणार असलेल्या उभयचर बसचा मार्ग केंद्राने अधिसूचना काढल्याने मोकळा झाला असून चालू महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर ती व्यावसायिक वापरात आणली जाईल आणि मार्चअखेरपर्यंत तिकिटे लावून पर्यटकांना या बसमधून सफरीचा आनंद लुटता येईल.  

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली. प्रात्यक्षिक घेऊनही गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ ही बस विनावापर पडून होती. जगभरात अशा प्रकारची वाहने चालू आहेत. या वाहनांना परवान्यांचा मार्ग मोकळा करणारी अधिसूचना केंद्र सरकारने नुकतीच काढल्याने हा अडसरही आता दूर झाला आहे. पाण्यात तसेच जमिनीवर चालणारी ही उभयचर बस पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

राज्यात अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाण्यात उतरणारे ‘सी प्लेन’ही सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती परंतु ती काही अजून प्रत्यक्षात प्रत्यक्षात आलेले नाही.  सी प्लेन चालविण्यासाठी हवाई वाहतूक संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणारा पायलट असावा लागतो. मुख्य वैमानिकाला किमान ५00 तास आणि सह वैमानिकाला किमान १२५ तास उड्डाणाचा अनुभव असायला हवा. ही सेवा सुरु करण्यासाठी सुप्रिम ट्रान्स्पोर्ट प्रा, लि, या कंपनीची निवड केलेली आहे. देशात कुठेही सी प्लेनची सेवा नाही. गोव्यातच आम्ही ती प्रथम सुरु करण्यात येणार आहे. परंतु कंपनीला अजून अनुभवी पायलट न मिळाल्याने दुसºया कंपनीकडे आता प्रयत्न केला जात असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. 

उभयचर बस हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या परवान्याची तसेच व्यावसायिक तत्त्वावर ती चालविण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. ही बस महामंडळाकडे उपलब्ध आहे परंतु गेले दीड वर्ष ती पडून होती. 

टॅग्स :goaगोवाnewsबातम्याTrafficवाहतूक कोंडी