शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्यात वर्षभरात 29.18 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 19:31 IST

मडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्यापुरते मर्यादित असलेले अंमली पदार्थाचे लोण आता दक्षिण गोव्यातही पोहोचले आहे हे 2017 च्या आकडेवारीने सिद्ध केले आहे.

मडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्यापुरते मर्यादित असलेले अंमली पदार्थाचे लोण आता दक्षिण गोव्यातही पोहोचले आहे हे 2017 च्या आकडेवारीने सिद्ध केले आहे. 2017मध्ये दक्षिण गोव्यात अंमलीपदार्थ विषयक 60 प्रकरणांची नोंद झाली असून, एकूण 29 लाखांचा माल पोलिसांनी पकडला आहे. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे 2016 साली दक्षिण गोव्यात अंमली पदार्थाचे केवळ 13 गुन्हे नोंद झाले होते.मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात सर्वात अधिक गुन्हे गांजा विषयक असून, मागच्या वर्षी दक्षिण गोवा पोलिसांनी 23.50 किलो गांजा पकडला होता, त्याची किंमत एकूण 23,48,000 अशी असून त्यापाठोपाठ 1.44 लाखांचा हशिष (144 ग्रॅम), 1.36 लाखांचे एलएसडी (0.323 ग्रॅम), 1.30 लाखांचा चरस (627.30 ग्रॅम), एक लाखाचा अ‍ॅक्सटसी (05.52 ग्रॅम), तर 60 हजारांचा कोकेन (10.49 ग्रॅम) पकडला असून, एकंदर पकडलेल्या अंमली पदार्थाची किंमत 29.18 लाख एवढी आहे.दक्षिण गोव्यातून अंमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले असून, लवकरात लवकर त्यावर उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे. अंमली पदार्थाचे जाळे मोडून टाकण्यासाठी पोलिसांना खब-यांचे जाळे वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. जर कुठेही अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती असल्याचे तेथे ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कायद्यांर्तगत मागच्या वर्षी पोलिसांनी एकूण 59 जणांना अटक केली. यातील सर्वात जास्त प्रकरणो मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहेत. या ठाण्यात एकूण 16 प्रकरणे नोंद झाली आहे.2016 साली अंमली पदार्थ प्रकरणी दक्षिण गोव्यात 13 जणांना अटक झाली होती.चौकट2017 साली पकडलेला अंमलीपदार्थगांजा 23.05 किलो. (रु. 23.48 लाख)चरस 627.30 ग्रॅम (रु. 1.30 लाख)कोकेन 10.49 ग्रॅम (रु. 60 हजार)हशिश 144 ग्रॅम (रु. 1.44 लाख)एलएसडी 0.323 ग्रॅम (रु. 1.36 लाखएक्सटसी 05.52 ग्रॅम (रु. 1 लाख) 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ