शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

...तर आमदारांनाही कर्माची फळे भोगावीच लागतात!; मंत्री सुदिन ढवळीकर यांचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:15 IST

सर्वच मतदारसंघात मगोचे काम सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: कोणाला मंत्रिमंडळात ठेवावे आणि कोणाला ठेवू नये, हा भाजपचा अंतर्गत निर्णय आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांविषयी मी काहीच बोलू शकत नाही. तरीही प्रत्येक आमदाराने पंच, सरपंच आणि सर्व लोकांशी आदराने वागायला हवे. जे आमदार चांगले बोलत नाहीत व लोकांशी चांगले वागत नाहीत, त्यांना स्वतःच्या कर्माची फळे भोगावीच लागतात, अशी खोचक प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी कवळे येथे व्यक्त केली.

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर व गावडे यांच्या खांडोळा येथील सभेनंतर पहिल्यांदाच ढवळीकर यांनी आपले मत मांडले आहे. अर्थात ढवळीकर यांनी गोविंद गावडे यांचे नाव घेतले नाही.

मनोहर पर्रीकर आजारी असताना तुम्हाला मुख्यमंत्री प्रस्ताव होता का? व त्याला गावडे यांनी आक्षेप घेतला होता काय? असे माध्यमांनी विचारले असता, ढवळीकर म्हणाले की, मनोहर पर्रीकर आजारी असताना मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाला विजय सरदेसाई आणि रोहन खंवटे यांनी देखील विरोध केला होता.

आता मी मुख्यमंत्री होणार की नाही हे सर्वस्वी जनतेवर आणि माझ्या नशिबावर अवलंबून आहे. जर माझ्या नशिबात मुख्यमंत्रिपद असेल, तर भविष्यात मी मुख्यमंत्री होऊही शकतो, शेवटी लोकांचा निर्णय जसा असतो, तसे घडते, असे उत्तर ढवळीकर यांनी दिले.

दरम्यान, मगो पक्षाचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. सर्वच मतदारसंघात पक्ष वाढविण्यावर आमचा भर असून त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत, असेही ढवळीकर यांनी सांगितले. राज्यात मगोचे काम चांगल्याप्रकारे सुरू असून यापुढेही अधिक गतीने करणार असे ढवळीकर यांनी सांगितले.

प्रियोळमध्ये मगो पक्ष आता पूर्ण क्षमेतेने काम करणार का? या प्रश्नावर बोलताना ढवळीकर म्हणाले की, मी राजकारणात असताना माझे पूर्ण लक्ष मगो पक्ष मजबूत करण्यावरच राहिले आहे. केवळ प्रियोळमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात मगो पक्षाचे मतदार व समर्थक आहेत. दाबोळी मतदारसंघात देखील मगोला निवडणुकीवेळी पाच हजार मते यापूर्वी मिळाली आहेत. यापुढेही प्रियोळसह सगळीकडे मगोपचे काम सुरू राहील. माझ्याकडे जी व्यक्ती कामानिमित्त येते ती व्यक्ती कुठल्या मतदारसंघातून आली आहे, कुणाचा मतदार आहे हे मी पाहत नाही. मला शक्य असल्यास मी कामे करतो आणि याचा मला अभिमानही आहे, असेही ढवळीकर म्हणाले.

मला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला होता. पर्रीकरांनी त्याला संमतीही दिली होती. मात्र, खंवटे आणि सरदेसाईंबरोबर त्या आमदाराने तीव्र आक्षेप घेतला होता. एवढ्यावरच न थांबता त्या आमदाराने एका बैठकीत मला अपशब्दही वापरले होते. पर्रीकरांना त्या आमदाराचे हे बोलणे आवडले नव्हते. मात्र, नियतीने आज त्याला त्याची शिक्षा दिली आहे. उशिरा का होईना परंतु, त्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागत आहे. त्यामुळे यापुढे तरी त्या आमदाराकडून चांगले कर्म अपेक्षित आहे. - सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण