शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 17:56 IST

दुबईहून प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाने ‘स्ट्येच्यु आॅफ लिबरटी’ च्या छोट्या शोभेच्या मूर्तीत ५८० ग्राम वजनाच्या पाच सोन्याच्या बिस्कीटे लपविली होती.

वास्को: दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर शुक्रवारी (दि.४) येथून बंगळुरला जाणार असलेल्या ‘एअर इंडिया’ विमानात तस्करीचे सोने असल्याची माहीती दाबोळीवरील कस्टम विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी ह्या विमानातील एका प्रवाशाकडून १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले.

दुबईहून प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाने ‘स्ट्येच्यु आॅफ लिबरटी’ च्या छोट्या शोभेच्या मूर्तीत ५८० ग्राम वजनाच्या पाच सोन्याच्या बिस्कीटे लपवून आणल्याचे कस्टम विभागाला तपासणीच्या वेळी उघड झाल्यानंतर सदर सोने जप्त करण्यात आले. दुबईहून दाबोळी विमानतळावर हे विमान पोचल्यानंतर गोव्यातून एक प्रवासी त्या विमानात चढल्यानंतर ते सोने तो बंगळुरला घेऊन उतरणार असल्याचे कस्टम विभागाला तपासणीत उघड झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याशी चौकशी चालू आहे.

नवीन वर्षाच्या पहील्याच दिवशी कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाकडून १९ लाख रुपयांची वेगवेगळी विदेशी चलने जप्त केल्यानंतर आज पुन्हा कस्टम अधिकाºयांनी केलेल्या कारवाईत १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया च्या ‘एआय-९९४’ विमानात एक प्रवासी तस्करीचे सोने घेऊन असल्याची माहीती पूर्वीच कस्टम अधिकाºयांना मिळाली होती. हा प्रवासी गोव्यात न उतरता बंगळूरला उतरणार असल्याची माहीती अधिकाºयांना उपलब्ध झाल्यानंतर दाबोळी विमानतळावर हे विमान पोचल्यानंतर त्यांनी विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली.

तपासणीदरम्यान सदर विमानात असलेल्या एका प्रवाशावर अधिकाºयांना संशय आल्याने त्यांनी त्याला बाजूत घेऊन त्याच्या सामानाची तपासणी करण्यास सुरवात केली. तपासणीच्या वेळी त्यांना सामानातून एक शोभेची मूर्ती आढळल्यानंतर ह्या मूर्तीची कसून पाहणी केली असता यात पाच सोन्याच्या बिस्कीट लपवण्यात आल्याचे उघड झाले. यानंतर ह्या प्रवाशाला ताब्यात घेऊन तस्करीच्या प्रकाराबाबत त्याची कसून चौकशी केली असता विमान दाबोळी येथे पोचल्यानंतर गोव्यातून एक प्रवासी विमानात चढून नंतर हे सोने तो बंगळुरला उतरवणार होता अशी माहीती त्यांनी कस्टम अधिकाºयांना दिली. गोव्यात ह्या विमानात चढलेल्या त्या प्रवाशाबाबत कस्टम विभागाला माहीती मिळाल्यानंतर त्यालाही येथे ताब्यात घेण्यात आले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिश्नर आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमिश्नर डॉ. राघवेंद्रा पी व इतर अधिकाºयांनी मिळून सदर कारवाई केली. जप्त करण्यात आलेले हे १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने कुठे नेण्यात येत होते याबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करी