शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पेडे येथील धोकादायक जंक्शनवर सहा वाहनात अपघात; ४ जण जखमी

By काशिराम म्हांबरे | Updated: January 28, 2024 15:31 IST

ट्रक चालकाच्या अंगावर संतप्त जमावाने धावून जाण्याचा प्रयत्न केला.  

काशिराम म्हांबरे, म्हापसा: अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या सतत वाहतुकीची वर्दळ सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पेडे येथील या धोकादायक जंक्शनवर आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ६ वाहनात अपघात घडला.  यात ३ ट्रक तसेच ३ दुचाकींचा समावेश होता.  या अपघातातील दोन दुचाकी ट्रकखाली आल्याने चिरडल्या गेल्या. त्यात दोन मुलांसह ४ जण जखमी झालेआहेत.  जखमींना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेतून जिवीतहानी मात्र झाली नाही.  मात्र झालेल्या अपघातातून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात भर म्हणून ट्रक चालकाच्या अंगावर संतप्त जमावाने धावून जाण्याचा प्रयत्न केला.  

एकूण ८ रस्ते मिळून तयार झालेल्या या जंक्शनवर दर दिवशी लहान मोठे अपघात  सतत घडत असतात. होत असलेल्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लाय ओवरची मागणी सुद्धा स्थानीकांकडून करण्यात आलेली. मात्र त्यावर प्रशासनाकडून आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. सरकारी पातळीवर अनेक वेळा जंक्शनची पाहणी सुद्धा करण्यात आलेली पण त्यातून काहिच निष्पन्न होऊ शकले नाही.  तसेच जंक्शनवर सिग्नलही बसवण्यात आले नाही. त्यामुळे सततचे अपघात  घडत असतात.  

अपघातग्रस्तातील एक ट्रक करासवाडावरून पर्वरीच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान जंक्शनवर पाण्याचा टँकर वळण घेत असताना हा अपघात घडला. त्यानंतर त्या ट्रक चालकानेतेथील जंक्शनवर असलेल्या दुचाकी चालकांना तसेच तिसºया ट्रकला धडक दिली. त्यात दुचाकी ट्रकच्या खाली आल्या. दुचाकी चालक सुदैवाने बचावले. जंक्शनवर वाहतुक पोलीस नसतात अशी माहिती स्थानीकांनी देऊन सरकारच्या दुर्लक्षामुळे अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात आला. जंक्शनवर मोठी दुर्घटना होण्यापूर्वी सरकारने लक्ष पुरवावे असेही स्थानिकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात