शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज मुक्त गोव्यासाठी एसआयओची पणजीत रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:03 IST

या मोहिमेचा समारोप आज २० डिसेंबर रोजी कला अकादमी येथून विद्यार्थ्यांच्या रॅलीने झाला.

- नारायण गावस

पणजी: ड्रग्जमुक्त राज्य म्हणून गोव्याची ओळख प्रस्थापित करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी समर्पित प्रयत्न करावेत, अशी मागणी स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) च्या गोवा विभागाच्या वतीने करण्यात आली. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढणे हा मोठा धोका आहे. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना ड्रग्ज सहज उपलब्ध होणे हा सर्वात मोठा धोका आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसआयओने १० ते २० डिसेंबर दरम्यान'डी ॲडिक्टिंग गोवा २.०' या थीमवर १० दिवसांची मोहीम आयोजित केली होती. 

या मोहिमेचा समारोप आज २० डिसेंबर रोजी कला अकादमी येथून विद्यार्थ्यांच्या रॅलीने झाला. एसआयओचे गोवा प्रदेशाध्यक्ष उस्मान खान म्हणाले, गोव्याची भविष्यातील वाटचाल केवळ तरुणच बदलू शकतात. विद्यार्थ्यांनी गोव्यातील शैक्षणिक संस्था आणि राज्यातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याची शपथ घेतली पाहिजे. अंमली पदार्थ मुक्त गोव्याची संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी एसआयओने दहा दिवसात अनेक उपक्रम राबवले. यादरम्यान त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कॅम्पस व्याख्याने आयोजित केली.त्यांनी ७ शहरांमधील २० हून अधिक ठिकाणी मूक नात्ये सादर केली.शिवाय रॅली काढली.राज्यभरातील १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला, पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटी, घरोघरी भेटी आणि कुटुंबांसोबत कॉर्नर मीटिंग, अमली पदार्थांच्या, व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबद्दल जनतेला जागरुक केले. या मोहिमेचा समारोप राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेने झाला ज्यामध्ये पणजी येथे ६० हून अधिक विद्यार्थी पात्र झाले आणि त्यांनी भाग घेतला.

'एसआयओ ' ने केलेल्या मागण्यागोव्यातील ड्रग हॉटस्पॉट ओळखणे आणि बंद करणे, सुट्टीच्या वेळेत तसेच दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत पोलिस व्हॅनने शाळा परिसरात गस्त घालावी,नागरी समाज आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येऊन सहाय्यक गट तयार करावे ,जे व्यसनाधीनांना सेवा देऊ शकतील आणि त्यांना पुनर्वसन प्रक्रियेत मदत करू शकतील. एसआयओ गोवाचा विश्वास आहे की प्रत्येकाच्या सहकार्याने गोव्यातील शैक्षणिक क्षेत्र आणि सर्वसाधारणपणे राज्यातून अंमली पदार्थांचे संकट दूर केले जाऊ शकते. 

टॅग्स :goaगोवा