शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर अभिभाषणात मौन, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:47 IST

नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे.

पणजी- नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि प्रादेशिक आराखड्याच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक टीका केली आहे. लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर सरकारकडून मौन राखले जात आहे हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांच्या अभिभाषणात स्पष्टता दिसून येत नाही. काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्यच केलेले नाही, तर काही मुद्द्यांचा अगदी ओझरता उल्लेख करून विषय टाळला गेला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाल्याचेही त्यांनी सांगितले.नाईक म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात सध्या ऐरणीवर आलेल्या ज्वलंत समस्यांच्या बाबतीत उल्लेख असेल, अशी अपेक्षा होती. परंतु जे जे महत्त्वाचे विषय होते त्यावर मौन राखले गेले. राज्यात प्रादेशिक आराखड्याचा मुद्दा हा सध्या गाजतो आहे. तसेच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला लोकांचा विरोध आहे. कोळसा हाताळणी व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत मुरगावात अजूनही वातावरण भीतीचे आहे. या मुद्द्यांचा उल्लेख झालेला नाही.मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणामुळे विधानसभेत हजर राहू शकत नसल्यामुळे एकूण कामकाजाचे दिवस मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले आहेत. केवळ ४ दिवसांचेच अधिवेशन ठरणार आहे. परंतु हे कमी करण्यात आलेले दिवस विधिमंडळपटूंना देण्यात यावेत. आता शक्य नसले तरी नंतरच्या अधिवेशनाचे दिवस वाढवून ते भरून काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराविषयी बोलताना नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योग्य उपचार घेऊन लवकर बरे होवोत. तसेच उपचारांसाठी त्यांना विदेशात जरी नेण्याची गरज असेल तरी त्यांना नेण्यात यावे असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस