शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थ, वाहतूक नियमांविषयी शिवसेनेची जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:12 IST

राज्यात ड्रग्स व तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण दिवसांगणिक वाढत चालले असून ही कीड आता शाळा, महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचली आहे.

पणजी : राज्यात ड्रग्स व तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण दिवसांगणिक वाढत चालले असून ही कीड आता शाळा, महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचली आहे. मानसिक आरोग्यविषय समस्या, तणाव व मौजमस्तीच्या नावाने विद्यार्थी हे अमंलीपदार्थांच्या आहारी जात आहेत. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण हा चिंतेचा विषय. अतिवेगाने वाहन चालवून स्वत:बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालणा-यांमध्ये युवकांची संख्या अधिक. या अपघातांत अनेकांनी जीवही गमावले असून बहुतेकजण कायमस्वरुपी पायबंदी झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थीवर्गात जागृती व संवेदनशीलतेची जाण करून देण्यासाठी शिवसेनेच्या गोवा विद्यार्थी संघटनेने (युगोअर्तंगत) खास ‘ नो ड्रग्स’ व ‘वाहतूक  नियमांचे पालन’ यासाठी खास मोहीम सुरू केली आहे. याचा श्रीगणेशा मंगळवारी (२१ आॅगस्ट) आल्तिनो-पणजी परिसरातील गोवा वास्तूकला महाविद्यालयातून केला.

यावेळी शिवसेना विद्यार्थी सेनाचे विद्यार्थी निरक्षक आणि प्रभारी चेतन पेडणेकर, विद्यार्थी कक्ष अध्यक्ष मथंन रनकाळे, विद्यार्थी कक्षउपाध्यक्ष नेहारीका कामत, सचिव विशाल तांडेल व इतर विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थी सेनेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्स तसेच वाहतूक नियमांचे महत्त्व विषद केले. या गोष्टींचे पालन करून लोकांमध्ये स्वत:हून मापदंड निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी वर्गांकडून या मोहीमेला उत्तम प्रतिसाद लाभला. याविषयी चेतन पेडणेकर म्हणाले, ज्या वयात नवीन ध्येय, संकल्पनाची धारणा मनात बाळगली पाहिजे, त्याच वयात ही युवापिढी भरकटत चाललेली आहे.विद्यार्थी हे तणाव कमी करण्यासाठी ड्रग्सचा उपयोग करतात. तर काहीजण मानसिक आरोग्यामुळे इतर औषधांचा नशाबाजीसाठी वापर करतात, या गोष्टी त्वरित थांबण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये वेगाने वाहने चालविण्याचे वेड लागलेले दिसून येते. यात ते स्वत:हून अपघातांना निमंत्रण देऊन या वेगाच्या शर्यतीत दुस-यांच्या जीवही धोक्यात टाकतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना विद्यार्थी संघटनेने ही मोहीम राबविण्यात निर्णय घेतलेला आहे. यापुढे राज्यातील इतर महाविद्यालयांमध्येही ही जागृती करणार असून संबंधित विद्यालयांच्या प्राध्यपकांना निवेदनही देणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाShiv SenaशिवसेनाTrafficवाहतूक कोंडीDrugsअमली पदार्थ