शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 20:41 IST

गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

पणजी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडले असून, आता ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. गोवा मार्गे सर्व बंडखोर आमदार मुंबईत जाणार आहे. यातच आता बंडखोर आमदार गोव्यातील कोणत्या हॉटेलमध्ये उतरणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

गुवाहाटीमध्ये हॉटेल रॅडिसनमध्ये तंबू ठोकून असलेले शिवसेना बंडखोर आमदार आता गोव्यात जाणार आहेत. गोव्यामध्ये हॉटेल ताज कन्व्हेन्शनमध्ये या आमदारांची सोय करण्यात आली आहे. दोना पावला येथील हॉटेल ताजमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी या हॉटेलसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई आहे. 

पंचतारिक हॉटेलमध्ये मुक्काम

बंडखोर आमदार गोव्यातील ताज कन्व्हेन्शन सेंट' या पंचतारिक हॉटेलमध्ये मुक्कामास असणार आहेत. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी १७ ते २२ हजार रूपये मोजावे लागणार आहेत. गोव्यातील या हॉटेलमध्ये आमदारांसाठी तब्बल ७० रूम बुक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

गोवामार्गे मुंबईला होणार रवाना

बंडखोर आमदार गुरुवारी गोव्यातून मुंबईसाठी रवाना होतील. राज्यपालांकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून सांगण्यात आले आहे.  तसेच बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, गोव्यातही भाजपच्या प्रमोद सावंत यांचे सरकार आहे. गुजरात आणि आसामनंतर आता पुन्हा एकदा बंडखोर आमदार भाजपचे सरकार असलेल्या राज्यात जात आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी बंडखोर आमदार गोव्यातून मुंबईला जाणार आहेत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आम्हा सर्वांना चांगले सहकार्य मिळाले. महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही सहभागी होणार आहोत. विश्वासदर्शक ठरावानंतर आमच्या विधिमंडळ गटाची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीति ठरवण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा