पणजी : कार्मिक खात्याकडून पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. शेखर प्रभुदेसाई यांना पुन्हा दक्षिण गोव्याचे अधीक्षक बनविण्यात आले आहे. तीन उपअधीक्षकांना बढती देऊन अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी अधीक्षक विजय सिंग यांना विशेष तपास पथकाचे प्रमुख तसेच विदेशी विभाग नोंदणी विभागाचा ताबा देण्यात आला आहे. प्रशिक्षक व वाळपई पीटीएसचा ताबा असलेले आत्माराम देशपांडे (आयपीएस) यांना पोलीस खात्याच्या कायदा व दक्षता विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. मुख्यालय अधीक्षकांकडे असलेला कायदा व दक्षता विभागाचा ताबा कमी करण्यात आला आहे. फ्रान्सिस फर्नांडिस यांना दक्षिण गोवा नियंत्रण कक्षाचा ताबा देण्यात आला आहे. वामन तारी यांना किनारा पोलीस विभागाकडून सुरक्षा विभागाचा ताबा देण्यात आला आहे. पर्वरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले उमेश गावकर यांना स्पेशल ब्रँच विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वामन तारी, उमेश गावकर व फ्रान्सिस फर्नांडिस यांना बढतीसह नियुक्तीचे आदेश मिळाले आहेत. (प्रतिनिधी)
शेखर प्रभुदेसाई पुन्हा दक्षिण गोव्याचे अधीक्षक
By admin | Updated: July 22, 2014 07:30 IST