शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तिचे जास्त लाड होतात म्हणून बारा वर्षाच्या मुलीचा मोठ्या बहिणीनेच घोटला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:25 IST

घरात लहान बहिणीला मिळणारे प्रेम पाहून मत्सरतेने मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा गळा दाबून खून केला. सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे रविवारी ही घटना घडल्याचे सोमवारी उघड झाले.

मडगाव, दि. 28 - घरात लहान बहिणीला मिळणारे प्रेम पाहून मत्सरतेने मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा गळा दाबून खून केला. सांगे तालुक्यातील बेणवाडा येथे रविवारी ही घटना घडल्याचे सोमवारी उघड झाले. दीड दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करुन घरी परतलेल्या काजल पप्पू यादव (वय 12) या छोट्या बहिणीचा गळा दाबून मोठ्या बहिणीने खून केला. सांगे पोलिसांनी 302 कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात ठेवले आहे. पोलिसांनी सोमवारी सकाळी पप्पू यादवच्या सर्व कुटुंबीयांना चौकशीसाठी सांगे पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी शेजा-यांना व काजल ज्यांच्या घरी विसर्जनासाठी गेली होती त्यांनाही पोलीस ठाण्यात आणले, पण काही उपयोग होत नव्हता. पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला मोठी बहीण नकारार्थी उत्तरे होती, पोलीस हिसका मिळाल्यावर तिने खुनाची कबूली दिली.बहिणीने दिलेली कबुली अशी  की, घटनेच्या रात्री काजल आईजवळ झोपण्यासाठी हट्ट करु लागली. आईजवळ झोपून मोबाईलवर गेम खेळता खेळता झोपी गेली, हे मी झोपेचे सोंग घेवून सर्व बघत होते. मी रात्रीचे तीन वाजण्याची वाट पहात होते. मिरवणूक घराशेजारुन जाताना तीन वाजता मी उठले. पाहिले तर आई व काजल गाढ झोपेत होत्या. आईला काहीच न कळता काजलच्या गळ्या भोवती नॉयलॉनची दोरी आवळली. ती तडफडू लागली व गतप्राण झाली. नंतर तिचा श्र्वास सुरु आहे असे पाहून दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. इतक्यात आई जागी होत असल्याचे पाहून हळूच माझ्या जागेवर जाऊन झोपले. काजल तडफडत होती हे मी हळूच बघत होते. आई तिला काय झाले असे विचारत होती तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.खून का केला या प्रश्नावर तिने सांगितले की, घरातील सगळी मंडळी काजलवर प्रेम करायचे. मला मात्र दुय्यम स्थान दिले जायचे. माझी कोणीच विचारपूस करीत नसत. यामुळे काजलला कायमचे संपवायचे असा निर्णय घेतला. 

टॅग्स :Crimeगुन्हा