शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

मडगावातील सोनसड्यावर आता सुक्या कचऱ्याचा नवीन डोंगर, शॅडो कौन्सिलकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:57 IST

मडगावातील कचऱ्यावर प्रभावी तोडगा काढण्यास अपयश आलेल्या मडगाव पालिकेसमोर आता बेलिंग न केलेल्या सुक्या कचऱ्याचे काय करावे हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.

 

मडगाव -  मडगावातील कचऱ्यावर प्रभावी तोडगा काढण्यास अपयश आलेल्या मडगाव पालिकेसमोर आता बेलिंग न केलेल्या सुक्या कचऱ्याचे काय करावे हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. बेलिंग न करता सोनसड्यावर जमा करून ठेवलेल्या या सुक्या कचऱ्याचाही आता डोंगर बनला असून, त्यामुळे एक नवा सोनसडा तर तयार होणार नाही ना अशी भीती नागरिकांना सतावू लागली आहे.यापूर्वी मडगाव पालिका ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणो अपयशी ठरल्याने न्यायालयाकडूनही या पालिकेला कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. प्रक्रिया न केलेला कचरा सोनसड्यावर टाकला जात असल्याने तेथे कचऱ्याचा डोंगर वाढला होता त्यामुळे हा डोंगर जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत या जागेत नवीन कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणो बंदी घातल्यानंतर शहरातून गोळा केला जाणाऱ्या सुक्या कचऱ्याचे करावे काय हा नवीन प्रश्न पालिकेसमोर उभा झाला होता. सध्या मडगाव पालिका सुका कचरा थैल्यात बांधून सोनसडय़ावर टाकू लागली आहे. दर दिवशी सुमारे 1400 थैल्या या जागेत साठवून ठेवल्या जातात.शॅडो कौन्सिलच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सोनसड्याला भेट दिली असता या सुक्या कचऱ्याचा डोंगर दिसून आला. मडगावात दर दिवशी सुमारे 15 टन सुका कचरा गोळा केला जातो. मात्र त्यापैकी दरदिवशी केवळ चार टन कचऱ्याचेच बेलिंग केले जाते. त्यामुळेच हा भल्या मोठय़ा प्रमाणात सुका कचरा साठून राहिला आहे. सध्या सोनसड्यावर साठून राहिलेला एकूण सुका कचरा दीड हजार टनापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यासंदर्भात बोलताना शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो म्हणाले, मडगाव पालिकेकडे फक्त दोन कचरा बेलिंग मशिन असून एका मशिनवर 300 किलो कचऱ्याचे बेलिंग करता येणो शक्य आहे. त्यामुळे दरदिवशी सरासरी चार टन कच:याचेच बेलिंग होते. इतर कचरा तसाच पडून रहातो असे ते म्हणाले.या कचऱ्यावर जर आताच  उपाययोजना केली नाही तर या सुक्या कचऱ्याचाही सोनसड्यावर आणखी एक मोठा डोंगर होणार आहे आणि भविष्यात तो धोकादायक ठरू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मडगाव पालिका या बाबतीत अजूनही सुस्त आहे ही एकदम शोचनीय बाब असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा