शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शॅक व्यावसायिकांची लगबग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 10:28 IST

पुढील महिन्यापासून सुरू होणा-या पर्यटन हंगामाची तयारी जोरात सुरुवात झाली आहे. कळंगुट किनारपट्टीवरील शॅकची आखणी करण्याचे काम पर्यटन खात्याकडून पूर्ण करण्यात आले असून या परिसरात कांदोळी ते सिकेरीपर्यंत १९४ शॅक उभारले जाणार आहेत. 

म्हापसा - पुढील महिन्यापासून सुरू होणा-या पर्यटन हंगामाची तयारी जोरात सुरुवात झाली आहे. कळंगुट किनारपट्टीवरील शॅकची आखणी करण्याचे काम पर्यटन खात्याकडून पूर्ण करण्यात आले असून या परिसरात कांदोळी ते सिकेरीपर्यंत १९४ शॅक उभारले जाणार आहेत. काही व्यावसायिकांनी शॅक घालण्याचे कामही सुरु केले असून १ आॅक्टोबरपासून आपला व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. येणा-या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या जलक्रीडा खेळांनासुद्धा मागील काही दिवसापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामा हळुहळू आकार घ्यायला लागला आहे. या वर्षी पर्यटन खात्याने कळंगुट ते बागापर्यंतच्या परिसरात १०५ शॅक्सना तर कांदोळी ते सिकेरीपर्यंत भागात ८८ शॅक्सना मान्यता दिली आहे. 

दोन शॅकमध्ये ५ मीटरांचे अंतरही ठेवले जाणार आहे. त्याचा फायदा लोकांना किना-यावर फिरताना होणार आहे. तसेच आपात्कालीन वेळेला वाहन सुद्धा किना-यावर आणणे सोयीस्कर ठरणार आहे. गेल्या वर्षी हे अंतर ३ मीटरचे होते. व्यावसायिकांना देण्यात आलेले परवाने तीन वर्षासाठीचे होते. त्यामुळे हा परवान्यांची मुदत या वर्षीचा हंगामा संपल्यानंतर संपुष्टात येणार आहे. पुढील वर्षी परवान्याची प्रक्रीया नव्याने सुरु केली जाणार आहे. 

केरळात आलेल्या पुरानंतर तेथील परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नसल्याने गोव्यात येणा-या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शॅक मालक कल्याण संघटनेने महासचिव जॉन लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा हंगामा चांगला होण्याची संभावना त्यांनी व्यक्त केली. केरळला जाणारे पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा इथल्या व्यवसायिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलक्रीडा व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य परवाने देण्यात आल्याची माहिती व्यावसायिकाने दिली. 

कळंगुट पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार हंगामा सुरु होण्यापूर्वी पंचायतीच्या वतीने संबंधीतांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत शॅक व्यावसायिक, पर्यटन पोलीस, कचरा कंत्राटदार, तसेच जलक्रीडा व्यावसायिकांचा त्यात समावेश राहणार असल्याचे सांगितले. व्यवसाय सुरू होण्यापूर्वी हाती घेण्याच्या उपाय योजनेवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कांदोळीचे सरपंच ब्लेज मिनेझीस यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात किनारपट्टी स्वच्छ राहणार याची दक्षता बाळगली जाणार आहे. त्यासाठी पंचायतीच्या वतीने योग्य पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवा