शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : मंदिरातील विनयभंग प्रकरणामुळे धार्मिकस्थळे महिला आयोगाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:37 IST

गोव्यातील मंगेशी गावच्या श्री मंगेश या अत्यंत प्रसिद्ध मंदिरातील पुजा-याने विनयभंग करण्याची घटना घडल्यानंतर गोव्याचे सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे.

पणजी : गोव्यातील मंगेशी गावच्या श्री मंगेश या अत्यंत प्रसिद्ध मंदिरातील पुजा-याने विनयभंग करण्याची घटना घडल्यानंतर गोव्याचे सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. लोकांमध्ये पुजा-याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. देवस्थान समिती प्रारंभी या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात अपयशी ठरल्याने आता गोवा महिला आयोगाला मंदिरे, मशिद, चर्च अशा धार्मिकस्थळांविषयी व्यापक भूमिका घ्यावी लागली आहे. मंदिरांमध्ये व अन्य धार्मिकस्थळांच्या ठिकाणी लैंगिक शोषणविरोधी समित्या स्थापन केल्या जायला हव्यात अशी शिफारस महिला आयोगाने केली आहे.

गोव्यातील सर्व धार्मिक स्थळांना महिला आयोगाने पत्र लिहिले आहे व लैंगिक शोषणविरोधी समित्या नेमण्याची शिफारस केली आहे. येत्या  30 सप्टेंबर्पयत अशा समित्या स्थापन करण्यासाठी आयोगाने मंदिरे, चर्चेस व मशिदींना वेळ दिला आहे. समित्यांवर महिलांच्या नियुक्त्या केल्या जाव्यात असे अपेक्षित आहे. देवस्थान समित्या व अन्य धार्मिक स्थळांकडे जर आवश्यक संख्येने महिला नियुक्त करण्यासाठी नसल्या तर त्यांनी अन्य महिलांची नियुक्ती करता येते. मात्र मंदिरे, चर्च व मशिदींमध्ये हजारो लोक जात असल्याने अशा ठिकाणी अंतर्गत लैंगिक शोषण समित्या असायला हव्यात. समित्या असल्या तरच तक्रारींसाठी कुणी त्या समित्यांकडे जाऊ शकेल. मंगेशी येथील मंदिराकडे अशा प्रकारची समिती नव्हती. दोघा तरुणींना विनयभंगाचा भयानक अनुभव आल्यानंतर त्यांना तक्रार करण्यासाठी प्रारंभी वाव मिळाला नाही. नंतर तक्रार आली तेव्हा देवस्थान समितीने वरवरची चौकशी केली पण प्रकरण योग्य त्या तपास यंत्रणोकडे पाठविण्यात समितीला अपयश आले. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या गोवा महिला आयोगाला मंदिरे, मशिदी व चर्चेसमध्ये लैंगिक शोषणविरोधी समित्या असाव्यात म्हणून सक्रिय व्हावे लागले आहे.

कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणविरोधी 2013 सालच्या कायद्यात दुरुस्त्या व्हायला हव्यात म्हणूनही महिला आयोग प्रयत्न करणार आहे. सर्व मंदिरे, चर्चेस व मशिदी या कायद्याच्या कक्षेत यायला हव्यात अशी भूमिका आयोगाने घेतली आहे व या भूमिकेचे समाजातून स्वागतही होत आहे. दरम्यान, विनयभंगाची तक्रार पोलिसांत आल्यानंतर गेले अनेक दिवस गायब असलेला धनंजय भावे हा 51 वर्षीय पुजारी अखेर न्यायालयास शरण आला. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.