शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

दोघांचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरुच, कळंगुट बीचवर बुडाले होते पाच जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:53 IST

पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता.

पणजी- गोव्यात फिरायला आलेल्या अकोल्याच्या १४ पैकी पाच जणांचा बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गोव्यातच नव्हे तर विदर्भाताही हळहळ व्यक्त झाली. पाचपैकी तिघांचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला होता. मंगळवारी दोघांचा मृतदेह  शोधण्याची मोहिम सुरुच होती. 

भारतीय नौसेना आणि जीवरक्षकांनी सकाळपासून समुद्रात खोलवर जाऊन मृतदेहाची शोधाशोध केली मात्र समुद्राच्या उसळलेल्या आणि वेगवान लाटा त्यामुळे जवानांनाही मोठी कसरत करावी लागली. दुपारपर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते.  किरण ओमप्रकाश मस्के व शुभम गजानन वैद्य या दोघांचे मृतदेह सापडू शकले नाहीत. किरणचे नातेवाईकही गोव्यात दाखल झाले आहेत. तसेच इतर दहा जण कळंगुट येथील एका हॉटेलात थांबले असून ते प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. आपल्या मित्रांसोबत झालेल्या घटनेमुळे इतरही पूर्णपणे बिथरलेले असल्याचे किरणचे चुलतभाउ मनोज मस्के यांनी सांगितले.

जीवरक्षक आणि नौसेनेच्या जवानांनी सकाळपासून शोध मोहिम सुरु केली होती. त्यांचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र कळंगुट किनाऱ्यावर कुठेही दगड नाहीत. तसेच समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह मिळतील, या आशेत आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.