शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

युतीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: February 26, 2015 02:28 IST

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि मिकी पाशेको यांचा गोवा

पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि मिकी पाशेको यांचा गोवा विकास पक्ष व सरकारमधील अपक्ष मंत्री-आमदार यांच्यात युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मगो पक्षाला फोंडा तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत येणारे जि. पं. मतदारसंघ व इतर पाच असे एकूण नऊ मतदारसंघ भाजपकडून सोडले जाणार आहेत. भाजपचे काही आमदार जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी युती नको, अशी भूमिका घेत होते; पण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी युती कायम असावी, असे ठरविले. मगो आणि गोवा विकास पक्ष आमच्यासोबत सत्तेत आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही पक्षांना घेऊन व अपक्ष मंत्री आवेर्तान फुर्तादो व आमदार बेंजामिन सिल्वा यांच्यासोबत एकत्रितरीत्या जिल्हा पंचायत निवडणूक लढवावी, असे भाजपने ठरविले. दिल्लीत मंगळवारी रात्री पर्रीकर, पार्सेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री दयानंद मांद्रेकर यांची बैठक झाली. त्या वेळी युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंत्री पाशेको यांच्या गोवा विकास पक्षासाठी सासष्टी तालुक्यातील नुवे व बाणावली या मतदारसंघातील तीन-चार जागा सोडल्या जातील. भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू केली आहे. निवडून येऊ शकतील अशा कार्यकर्त्यांची यादी भाजपने बनवली आहे. (खास प्रतिनिधी)